घरलाईफस्टाईलकिडनी स्टोनवर घरगुती उपाय

किडनी स्टोनवर घरगुती उपाय

Subscribe

किडनी स्टोन झाल्यास आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो. मात्र या आजारावर देखील घरच्या घरी औषधे करु शकतो.

किडनी स्टोन म्हणजे मूतखडा यास वैद्यकीय भाषेत युरीनरी कॅल्कुलस असे म्हटले जाते. हा आजार कोणत्याही वयात होतो. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कोणालाही होण्याची शक्यता असते. तसेच हा आजार रात्री-अपरात्री चाळवतो अशावेळी डॉक्टर उपल्बध नसतात. त्या परिस्थिती नेमके काय करावे ते कळत नाही. अशावेळी घरच्याघरी घरगुती औषधांचा वापर करता येऊ शकतो.

आवळा

किडनी स्टोनचा आजार असणाऱ्या व्यक्तींने आवळ्याच्या चूर्णासोबत मुळा खावा. यामुळे त्वरित आराम पडतो.

- Advertisement -

Amla

डाळिंब

डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने किडनीचे दुखणे थांबते. त्याचप्रमाणे दररोज डाळिंब खाल्याने किडनी स्टोन पडण्यास मदत होते.

pomegranate

 

- Advertisement -

तुळशीची पाने

तुळशीच्या पानात जास्त प्रमाणात बी विटामिन असते. त्यामुळे किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींने तुळशीची पाने दररोज खाल्याने किडनी स्टोन पडण्यास मदत होते.

tulsi_mini

 

बडीशेप

किडनी असलेल्या व्यक्तींने बडीशेप, धणे आणि खडीसाखर हे मिश्रण मिक्स करुन दीड लिटर पाण्यात भिजवून ठेवावे. २४ तासानंतर हे पाणी गाळून त्या मिश्रणाची पेस्ट करुन दररोज १ चमचा हे मिश्रण अर्ध्या कप मिक्स करुन प्यावे.

badishep

काळी मिरी

बेलाच्या पानातून काळी मिरी खाल्याने दोन आठवड्यात किडनी स्टोन पडण्यास मदत होते.

black pepper essential oil

गवत

पाण्यात गवत उकळून त्याचा काढा तयार करावा. त्या काढ्यामध्ये लिंबाचा रसाचे मिश्रण करावे, या पाण्याचे दररोज सेवन केल्यास किडनी स्टोन पडण्यास मदत होते.

Grass

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -