Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल मासिक पाळीवर घरगुती उपाय

मासिक पाळीवर घरगुती उपाय

मासिक पाळी येणे हे नैसर्गिक आहे. मात्र काह महिलांना त्या दिवसात होतो. हा त्रास घरगुती उपायांनी दूर केला जाऊ शकतो. जाणून घ्या मासिक पाळी दरम्यान करावव्याचे घरगुती उपाय

Related Story

- Advertisement -

मासिक पाळीचे दिवस हे स्त्रियांसाठी एक मोठी डोके दुखी ठरते. या दिवसात स्त्रियांच्या पोटात दुखणे, थकवा येणे, चिडचिड होणे असे त्रास उद्भवतात. अशावेळी घरच्या घरी मासिक पाळीवर उपाय करुन आराम मिळू शकतो. जाणून घेऊया कोणते ते उपाय…

milkदूध

मासिक पाळीच्या दिवसात पोटात दुखते. अशावेळी पोटाला व्हिक्स लावून गरम पाण्याचा शेक घ्यावा. त्याचबरोबर नाश्त्यामध्ये एक ग्लास दुधाचा समावेश करावा. दुधाच्या कॅल्शिअममुळे पोटदुखी कमी होण्यास मदत होते.

water
गरम पाणी

- Advertisement -

या दिवसात गरम पाण्याचा पिण्याकरता वापर करावा. तसेच आंघोळीसाठी देखील गरम पाणी वापरावे यामुळे पोट आणि पाठीला आराम मिळतो.

papayaपपई

पाळीच्या दिवसात पपई खावी यामुळे होणारा प्रवाह नियंत्रीत होतो. त्याचप्रमाणे गाजराचा ज्यूस घेतल्याने आराम मिळतो.

Jeera
जिरं

- Advertisement -

मासिक पाळीच्या त्रासावर जीऱ्याचे पाणी पिणे हा एक रामबाण उपाय आहे. जीऱ्याचे पाणी पिल्याने मासिक पाळी नियंत्रणात राहते. त्याचबरोबर जिऱ्यांमध्ये असलेल्या लोहामुळे महिलांनी मासिकपाळीत होणारा त्रास कमी होतो.

sounf
बडिशेप

बडिशेप किंवा धणे हे मासिक पाळीवर फायदेशीर ठरतात. मासिक पाळीवर दरम्यान बडिशेप किंवा धणे रात्रभर भिजवून ठेवावे आणि सकाळी हे पाणी पिल्यास त्वरित आराम पडतो.

- Advertisement -