घरलाईफस्टाईललहान मुलांच्या केसातील कोंडा कमी करण्याचे घरगुती उपाय!

लहान मुलांच्या केसातील कोंडा कमी करण्याचे घरगुती उपाय!

Subscribe

मुलांच्या खांद्यावर कोंडा पडलेला दिसल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. काही घरगुती उपायांनी त्यावर मात करता येऊ शकते. हे उपाय मुलांच्या केसांतील कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील.

वाढत्या प्रदुषणाचा परिणाम आता लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांवरच दिसू लागलाय. मग तो परिणाम त्वचेच्या समस्येविषयी तर, श्वसनाच्या समस्येविषयी इतकंच काय तर हल्ली या प्रदुषणाचा परिणाम केसांवर सुद्धा दिसतोय. यात लहान मुलांच्या केसांवर कमी वयात केसांमध्ये कोंडा निर्माण होण्याच्या समस्या दिसून येत आहेत.

मुलांच्या खांद्यावर कोंडा पडलेला दिसल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. काही घरगुती उपायांनी त्यावर मात करता येऊ शकते. हे उपाय मुलांच्या केसांतील कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील.

  • केसातील कोंडा कमी करण्यासाठी टी ट्री ऑईल हा घरगुती उपाय फायदेशीर ठरतो. यामुळे त्वचा शुष्क होण्याची समस्या कमी होते. याकरिता १२ थेंब टी ट्री ऑईल, पाऊण कप बदामाचे, ऑलिव्ह किंवा जोजोबा तेलामध्ये मिसळा. त्यामध्ये कापसाचा बोळा भिजवून टाळूवर फिरवा. ३० मिनिटांनंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
  • लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅसिड अधिक प्रमाणात आढळते. त्यामुळे टाळूवर त्याचा रस चोळावा. यामुळे केसांतील कोंडा कमी होण्यास मदत होते.
  • केस ओले करून त्यावर मूठभर बेकींग सोडा भुरभुरा. त्यानंतर मसाज करा. सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवा. बेकींग सोड्यामुळे फंगसची वाढ रोखण्यास मदत होते.
  • अर्धे केळं, एक टेबलस्पून दही आणि चार टेबलस्पून बदामाचे तेल एकत्र करून हेअर मास्क बनवा. बोटांनी हलकासा मसाज करून २० मिनिटांनी केस माईल्ड शाम्पूने स्वच्छ धुवा.
  • मुलांचे केस धुण्यासाठी शाम्पूची निवड करताना त्यामध्ये केमिल कमी असल्याची खात्री करून घ्यावी. त्या शाम्पूने आठवड्यातून दोनदा केस धुवावेत. मुलांचा शाम्पू निवडताना डॉक्टरांचा सल्लादेखील अवश्य घ्यावा.
  • केस धुण्यापूर्वी केस थोडे विंचरून घ्यावेत. यामुळे वर-वरचा कोंडा बाहेर पडायला मदत होते. तुम्ही एखादा मेडीकल शाम्पू वापरत नसाल तर किमान मुलांसाठींचे खास शाम्पू अवश्य वापरा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -