आधुनिकतेच्या जगात वावरत असताना वापरली जाणारी बैठी जीवनशैली शरीराच्या अनेक आजारांचे कारण ठरत आहे. दिवसाचे 8 ते 10 तास सतत एकाच जागी बसून कॉम्प्युटरवर काम केलं जातंय. घरी आल्यावरही मोबाइल किंवा टिव्हीसमोर बसून वेळ घालवला जात आहे. या सर्व सवयींमुळे मानेचं दुखणं ही आजकालची सर्वात सामान्य समस्या झाली आहे. काही वेळा मानेचं दुखणं हे खांद्यापासून ते अगदी हातापर्यत येऊन पोहोचते. ज्यामुळे सर्वच अवघड होऊन बसते. कोणतेच काम करता येत नाही. तुम्ही सुद्धा मानदुखीने त्रस्त असाल तर हा लेख तुमच्यासाठी. आज आम्ही तुम्हाला मानदुखीमागील काही साधारण कारणे आणि त्यावरील उपाय सांगत आहोत.
मानदुखीची कारणे –
स्ट्रेस –
स्ट्रेसमुळे स्नायू घट्ट होतात. शरीरातील स्नायू घट्ट झाले की, मानदुखीचा त्रास सुरू होतो.
दुखापत –
तुमचा लहान असताना एखादा अपघात किंवा खेळताना दुखापत झाली असल्यास त्याचा त्रास वय वाढल्यावर होऊ शकतो. ज्यामुळे सांधेदुखी, मानदुखी अशा शरीराच्या व्याधी सुरू होतात.
चुकिची लाइफस्टाइल –
मानदुखीला बैठी जीवनशैली कारणीभूत ठरत आहे. झोपण्याची स्थिती योग्य नसल्यास त्याचा परिणाम मानेच्या हाडांवर होऊन मानदुखी सुरू होते.
मानदुखीवर उपाय –
- मान दुखत असल्यास टेनिस बॉलच्या मदतीने मानेवर हलक्या हाताने मसाज करू शकता. या मसाजमुळे मानदुखीपासून आराम मिळतो आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो.
- मान दुखत असल्यास मान हळूहळू तुमची मान छातीपर्यत खाली घेऊन जा. त्यानंतर काही मिनिटांनी मान सरळ करून मागच्या बाजूला झुकवा. परत काही मिनिटांनी ती सरळ करा, यामुळे मानदुखी थांबेल.
- मान दुखत असल्यास बर्फाचा वापर करता येईल. बर्फाचा उपाय करण्यासाठी एका कॉटन कपड्यात बर्फ घेऊन तो मानेवरून फिरवा.
- मानेचे स्नायू मोकळे न झाल्यास मानदुखी सुरू होते. मानेचे स्नायू मोकळे करण्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करावी.
- तीळ, मोहरी किंवा खोबरेल तेलाने तुम्ही मानेची मालिश करू शकता. फक्त मालिश करत असताना दाब जास्त देऊ नये, केवळ हलक्या हाताचा वापर करावा.
- झोपताना मान आणि मणका सरळ राहिल याची काळजी घ्यावी. उंच उशी घेऊ नये.
- खूप जास्त त्रास होत असल्यास तुम्ही फिजिओथेरेपीस्टची मदत घेऊ शकता.
हेही पाहा –