Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कोरड्या खोकल्यावर करा घरगुती उपाय

कोरड्या खोकल्यावर करा घरगुती उपाय

Subscribe

कोरड्या खोकल्यावर हे घरगुती उपाय तुम्ही जरुर करा.

सध्याच्या परिस्थिती खोकला, सर्दी हमखास होते. बदलत्या हवामानाचा परिणाम आपल्या शरिरावर होत असतो. आता परिस्थिती खोकल होणे ही सामान्य समस्या राहिली नाही आहे. आपल्या साधा कोरडा खोकला आला तरी लगेच लोक संशयित नजरेने आपल्याकडे बघायला लागला. खोकला, सर्दी, ताप ही करोनाची लक्षणे असल्यामुळे आताच्या परिस्थिती आपण स्वतःला या आजारापासून दूर ठेवणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आज आपण कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय काय होऊ शकतात हे जाणून घेणार आहोत.

कोरडा खोकला असेल तर थंड पाणी आणि पदार्थ टाळावेत. दिवसभर गरम पाणी प्यावे.

- Advertisement -

तसंच कोरड्या खोकला पूर्णपणे बरा होण्यासाठी हळदीचं दूध हे खूप प्रभावी असते. त्यामुळे हळदीचे दूध प्यावे.

तसंच सकाळी आणि रात्री पाण्यात हळद, मीठ टाकून त्याच्या गुळण्या कराव्यात.

- Advertisement -

ज्येष्ठमधाच सेवन करावं ज्यामुळे कोरड्या खोकल्यापासून मुक्ती मिळले.

नाक, गाल, घसा आणि छातीवर सुंठ उगाळून त्याचा लेप लावावा.

घश्यात होणारी खवं-खवं आणि थंडपणावर त्वरीत आराम मिळवण्याकरिता गरम पाण्याची वाफ घ्या.

सकाळी आणि सायंकाळी मसुरीचे आणि उडादाचे गरमागरण कढण त्यामध्ये तूप टाकून प्यावे.


हेही वाचा – कुपोषणाप्रमाणेच अतिपोषणही तितकेच घातक


 

- Advertisment -