सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्यामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवणे सामान्य आहे. अशातच त्वचेसंबंधित समस्येपासून दूर राहण्यासाठी काही प्रकारचे उपाय केले जातात. चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काही प्रकारचे फेस पॅक किंवा स्क्रबचा वापर करू शकते. त्वचेला हेल्दी ठेवण्यासाठी स्किन केअर रुटीन फॉलो करण्याचा सल्ला दिला जातो. चेहऱ्याला स्वच्छ ठेवण्यासह शरिराला सुद्धा पॉलिश करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे त्वचेची चमक कायम राहते. असे केल्याने डेड स्किन सुद्धा निघते. अशातच तुम्ही बॉडी स्क्रबसाठी पर्याय निवड असाल तर पुढील काही स्क्रब जरुर पहा. (homemade body scrub)
साखर
साखर उत्तम बॉडी स्क्रबर आहे. यामुळे बॉडी स्क्रब केल्याने डेड सेल्स निघून जातात आणि त्वचेला चमक येते. शुगर स्क्रबसोबत 2-3 चमचे नारळाचे तेल किंवा बदामाचे तेल घेऊन त्याने मसाज करावे.
कॉफी
कॉफी शरिरावरील डेड स्किन काढण्यास फायदेशीर आहे. त्याचसोबत यामध्ये असलेले कॅफेन स्किनला घट्ट ठेवण्यास मदत करते आणि त्वचा उजळते. कॉफी स्क्रब तयार करण्यासाठी कॉफीमध्ये ऑलिव्ह ऑइल मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा आणि बॉडीवर स्क्रब करा.
ओटमील
ओटमील स्क्रब सेंसिटीव स्किनसाठी फार फायदेशीर असते. ते बनवण्यासाठी सर्वात प्रतम ओट्स घ्या आणि त्यात दही मिक्स करुन ते स्क्रब लावा.
मसूरची डाळ
मसूरची डाळ तुम्ही स्क्रबच्या रुपात वापर करू शकता. यामुळे त्वचा मऊ होईल. यासाठी मसूरच्या डाळीची पावडर, मध आणि ऑलिव्ह ऑइल मिक्स करा.
तांदळाचे पीठ
जर त्वचा उजळ व्हावी असे वाटत असेल तर तांदळाचे पीठ उत्तम पर्याय आहे. तांदळाच्या पीठाचा स्क्रब बनवण्यासाठी त्यात दही किंवा पाणी मिक्स करा.