Monday, January 20, 2025
HomeमानिनीBeauty Tips : हिवाळ्यात कोरड्या केसांसाठी होममेड केअर

Beauty Tips : हिवाळ्यात कोरड्या केसांसाठी होममेड केअर

Subscribe

हिवाळा सुरु झालेला असून, उन्हाळ्यात आपली केस तेलकट होत असतात तर हिवाळ्यात आपल्या त्वचेसह केस देखील कोरडे होतात. हिवाळ्यात कमी तापमानामुळे वातावरणातील आर्द्रता कमी होते. त्वचेप्रमाणेच केस देखील कोरडे होऊ लागतात. थंड आणि कोरड्या वातावरणामुळे केसांचा ओलावा कमी होऊन ते कोरडे होतात . यामुळे केस कोरडे तर होतातच पण कमकुवतही होतात. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात, हिवाळ्यात कोरड्या केसांसाठी कोणते घरगुती उपाय करावे.

नारळाचं तेल

नारळाच्या तेलामध्ये अँटीऑक्सिडेन्टचे मोठ्या प्रमाणात गुणधर्म आढळतात. 5 ते 10 मिनिटे हलक्या हाताने मालिश केल्याने केसातील कोरडेपणा निघून जातो.

कांद्याचा रस

कांद्याचा रस केसांसाठी खूप फायदेशीर असतो. यामध्ये पोटॅशिअम, झिंक आणि मिनरल्स असे महत्वाचे घटक असतात. दोन ते तीन मोठे चमचे कांद्याचा रस आणि खोबरेल तेल यामध्ये मिसळून मिश्रण एकजीव करून घ्या. काही वेळ केसांना लावून मसाज करा. आणि तासाभरानंतर केस धुवा.

एलोवेरा

एलोवेरा जेल त्वचेसह केसांसाठी देखील खूप फायदेशीर असते. केसांना मजबूत करण्याचे काम करते. त्यांची चमक देखील वाढवते. एलोवेरा जेलने हलक्या हाताने मसाज केल्यानंतर तासभर ठेवा आणि नंतर शॅम्पूने स्वच्छ धुवा. केसातील काेरडेपणा जाण्यासाठी आठवड्यातून दोनदा मसाज करा.

पेपरमिंट तेल

पेपरमिंट तेल हे केसांच्या टाळूमध्ये पीएच संतुलन राखण्यास मदत करते. या तेलामुळे केस गळती, केस कोरडे होणे इत्यादी समस्या दूर होतात.

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे केसांसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जातात. मेथीचे दाणे बारीक केसांसाठी, कोंडा, कोरडे केस आणि खाज सुटणे यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून वापरले जातात. मेथीचे दाणे 45 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. नंतर या दाण्यांना पिसून याची पेस्ट बनवून घ्या. आता 2 चमचे तेल मिसळून. हलक्या हाताने केसांना लावून मालिश करा. 30 मिनिटा नंतर शैंपूने स्वच्छ धुवा.

रोझमेरी तेल

आजकाल बरेच लोक केसांसाठी रोझमेरी तेल वापरतात. आपल्या नियमित शॅम्पूमध्ये रोझमेरी तेलाचे 5-6 थेंब घाला. एकत्र मिसळा आणि काही मिनिटांसाठी केस आणि टाळूवर हळूवारपणे मालिश करा. याने केस गळती, केस कोरडे होणे पूर्णपणे थांबेल.

आवळा तेल

आवळा तेल केसांना मॉइश्चरायझ करण्यास आणि केसांना ताकद देण्यास मदत करते. हे डोक्यातील कोंडा, पांढरे होणारे केस दूर करण्यास देखील मदत करते. आवळा तेल गरम करून 15 ते 20 मिनिटे मालिश करून केस स्वच्छ धुवा.

हेही वाचा : Coconut Oil : त्वचेसाठी फायदेशीर आहे खोबरेल तेल


Edited By : Prachi Manjrekar

 

Manini