Friday, March 28, 2025
HomeमानिनीBeauty Tips : होममेड केमिकल फ्री ब्लिच

Beauty Tips : होममेड केमिकल फ्री ब्लिच

Subscribe

महिला अनेकदा आपला चेहरा उजळवण्यासाठी विविध उत्पादने वापरतात. फेस ब्लीच हा यापैकी एक पर्याय आहे. ज्याच्या मदतीने चेहरा चमकदार आणि तजेलदार राहतो. यासाठी अनेक महिला पार्लरमध्ये किंवा मार्केटमधून ब्लीच करण्याचं सामान घेऊन येतात. बऱ्याचवेळा पार्लरमधून ब्लीच केल्यामुळे चेहरा चमकदार दिसण्याऐवजी त्यावर मोठे मुरुमे आणि पुरळ येतात. या प्रकारच्या केमिकलयुक्त ब्लीचमुळे त्वचेचे खूप नुकसान होते. यामुळे त्वचेवर कोरडेपणा, जळजळ आणि पुरळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला तुमची त्वचा कोणत्याही हानीशिवाय उजळवायची असेल तर तुम्ही होममेड केमिकल फ्री ब्लिच करू शकता.

होममेड ब्लिच असं तयार करा

टोमॅटो आणि लिंबू ब्लिच

टोमॅटोमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग घटक असतात, जे त्वचेचा टॅनिंग आणि निस्तेजपणा कमी करण्यास मदत करतात. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे त्वचेला उजळवते. आता एका टोमॅटोचा रस काढा आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे तसेच राहू द्या. कोमट पाण्याने धुवा. यामुळे त्वचा टॅनमुक्त आणि चमकदार होईल.

दही आणि बेसन ब्लीच

दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचेला एक्सफोलिएट करते, ज्यामुळे ती चमकदार आणि मऊ होते. त्याचवेळी बेसन टॅनिंग आणि मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. दहीमध्ये एक चमचा बेसन मिसळा.ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे सुकू द्या. ते सुकल्यानंतर, हलक्या हाताने स्क्रब करून धुवा. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होईल.

पपई आणि मध ब्लीच

पपई त्वचेला पांढरे करण्यास आणि डाग कमी करण्यास मदत करतात. मध त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि ती मऊ करते. अर्धा कप पिकलेली पपई घ्या आणि मॅश करून घ्या. त्यात एक चमचा मध घाला आणि चांगले मिसळा.ते १५-२० मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. नंतर पाण्याने धुवा. यामुळे त्वचा चमकदार आणि ताजी दिसेल.

संत्र्याची साल आणि दुधाच ब्लीच

संत्र्याच्या सालीमध्ये असलेले सायट्रिक अॅसिड नैसर्गिकरित्या त्वचेला उजळवते आणि डाग कमी करते.दूध त्वचेला मऊ आणि हायड्रेट ठेवते. वाळलेल्या संत्र्याच्या साली बारीक करून पावडर बनवा. त्यात दोन चमचे दूध मिसळून पेस्ट तयार करा.ही पेस्ट चेहऱ्यावर लावा, १५ मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर धुवा.
यामुळे चेहऱ्याचा रंग सुधारेल आणि डाग कमी होतील.

हेही वाचा : Holi Skin Care: या सोप्या पद्धतीने चेहऱ्यावरील पक्का रंग असा काढा


Edited By : Prachi Manjrekar

Manini