घरलाईफस्टाईलघरी लावलेलं दही आंबट होतंय? 'या' सोप्या टिप्स नक्की ट्राय करा

घरी लावलेलं दही आंबट होतंय? ‘या’ सोप्या टिप्स नक्की ट्राय करा

Subscribe

घरी बनविलेल्या दह्याबाबत अनेकांची तक्रार असते की, दही पातळ होतं किंवा आंबट होतं. याच संदर्भात काही महतवाच्या पण सोप्या टिप्स जाणून घेऊ ज्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.

आपलं आरोग्य उत्तम राहावं यासाठी योग्य आणि सकस आहार घेणं अत्यंत गरजेचं असतं. त्याचप्रमाणे दही(curd) खाणं किंवा दह्याचं सेवन करणं हे आरोग्यसताही उत्तम असतं. दही शरीराला थंड ठेवण्यासाठी मदत करते. दह्याच्या गुणधर्मांमुळे डॉक्टर सुद्धा दही खाण्याचा सल्ला देतात. दह्याच्या सेवनाने शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्याच बरोबर दात आणि हाडं सुद्धा दह्याच्या सेवनाने बळकट बनतात. त्याशिवाय दही खाल्ल्याने हृदय सुद्धा निरोगी राहते. दह्याच्या सेवनाने केस सुद्धा मजबूत होतात. तर दादयपासून अनेक पदार्थ सुद्धा बनविता येतात. म्ह्णून बहुतांश घरात दही सहज उपलब्ध असतेच.

हे ही वाचा – रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

- Advertisement -

हल्ली बाजारात वेगवेगळ्या फ्लेवर्सचे दही उपलब्ध होतात. पण घरी घरी बनविनेल्या दह्याची चव वेगळीच असते. पण घरी बनविलेल्या दह्याबाबत अनेकांची तक्रार असते की, दही पातळ होतं किंवा आंबट होतं. याच संदर्भात काही महतवाच्या पण सोप्या टिप्स जाणून घेऊ ज्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.

curd
घरगुती आणि नैसर्गिकरित्या गोठवलेले दही हे स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दही हे चांगले बॅक्टेरिया असलेले नैसर्गिक प्रोबायोटिक आहे, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीराला अनेक रोगांशी लढण्यास मदत करते.

- Advertisement -

हे ही वाचा –  पावसात भिजण्यापूर्वी केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ टिप्सचा नक्कीच उपयोग होईल

दही बनविण्यासाठी दूध चांगले उकळवा

दही बनविण्यासाठी दही फक्त गरम करून घेणे गरजेचे नसते तर ते तर मोठया आचेवर चांगले खुलून घ्या. आणि त्या नंतर २० मिनिटे मंद आचेवर ठेऊन आटवून घ्या. मंद आचेवर दूध उकळून घेतल्याने त्यातही ओलावा कमी होतो आणि दूध किंचित घट्ट होते. त्याने दही गोड होते.

जुन्या दह्याचा योग्य प्रमाणात वापर करा

बरीच मंडळी घरात असलेले जुने दही, ताक किंवा लोण्यापासून नवीन दही बनवतात. दही सेट करण्यासाठी जुने दही किती प्रमाणत घ्यावे याची कल्पना असणे आवश्यक आहे. जुने दही दुधात प्रमाणानुसार मिसळा.

दही सेट करण्यासाठी किती वेळ ठेवावे

काही जण खूप जास्त वेळ दूध सेट करण्यासाठी ठेवतात. गरजेपेक्षा जास्त वेळ दूध सेट झालं तर दही आंबट होऊ शकते. म्ह्णून दही सेट होण्यासाठी 7 तासांचाच वेळ जाऊ द्यावा. त्याचबरोबर दाहयत असलेले अधिकचे पाणी सुटी कापडाने गाळून घेतल्यास दही सहज घट्ट होईल.

हे ही वाचा –  Vegan Diet म्हणजे काय ? बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा करतात फॉलो

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -