उन्हाळा सुरू झाला असून अनेकजणांना त्वचेच्या समस्या सुरू झाल्या आहेत. यावर उपाय म्हणून अनेकांनी सौंदर्य प्रसाधने, महागडे उत्पादने सुद्धा घेतली असतील. कारण प्रत्येकाला आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य जपायचे असते. उन्हाळ्यात मात्र चेहऱ्याचे सौंदर्य जपताना नाकीनऊ येतात. अशावेळी तुम्ही बाजारातील महागडी उत्पादने वापरण्यापेक्षा घरगुती उपाय करायला हवा. प्रामुख्याने उन्हाळ्यात स्किन टॅनिंग, रॅशेस, त्वचा लाल होणे अशा तक्रारी सुरू होतात. या तक्रारींवर सर्वात रामबाण उपाय व्हिटॅमिन सी असे सांगितले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी व्हिटॅमिन सी फेस मास्क घरी कसा बनवायचा याची सोपी पद्धत सांगणार आहोत.
साहित्य –
- संत्र्याचे तुकडे
- मध – 1 चमचा
- दही – 1 चमचा
- हळद – चिमूटभर
कृती –
- मिक्सरमध्ये संत्र्याचे तुकडे टाकावेत.
- यानंतर त्यात मध, दही आणि चिमुटभर हळद मिक्स करावी.
- तुमचा व्हिटॅमिन सी फेस मास्क तयार झाला आहे.
फेस मास्क लावण्याची पद्धत –
- तयार फेस मास्क तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावर लावायचा आहे.
- जवळपास 15 मिनिटे चेहऱ्यावर फेस मास्क तसाच ठेवा.
- 15 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.
- चेहरा कोरड्या कपड्याने पुसून घ्यावा.
- यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायजर लावावे.
फेस मास्कचे फायदे –
- या फेस मास्कमुळे त्वचा हायड्रेट राहील.
- त्वचेला एक वेगळीच चमक येते.
- त्वचेतील कोलेजन वाढते.
- सुरकुत्यांची समस्या कमी होते.
- त्वचा निरोगी राहते.
- चेहऱ्यावर असमान रंगाची समस्या असेल तर हा फेस मास्क अवश्य वापरावा.
- काळे डाग, मुरुमांच्या खुणा सहजतेने कमी होतात.
हेही पाहा –