Saturday, February 8, 2025
HomeमानिनीCinnamon : मधासोबत दालचिनी खाण्याचे फायदे

Cinnamon : मधासोबत दालचिनी खाण्याचे फायदे

Subscribe

मध आणि दालचिनी दोन्ही पदार्थ पोषणांनी परिपूर्ण आहेत. अनेक आजारांवर उपाय म्हणून दालचिनी आणि मधाचा वापर केला जातो. आयुर्वेदात मध आणि दालचिनीचा वापर औषध तयार करण्यासाठी केला जातो. दालचिनी आणि मध प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असतात. दोन्हींचा वापर करुन मसाले तयार केले जातात. पदार्थांची चवही वाढते. आयुर्वेदानुसार, मधासोबत दालचिनी खाण्याने काय फायदे होतात..

  • मधासोबत दालचिनी खाल्ल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. खाज सुटणे, जळजळ, दाद, पुरळ अशा तक्रारींनी हैराण झाले असाल तर मधासोबत दालचिनीचे सेवन करावे.
  • पोटदुखी, सूज, जुलाब आणि अल्सर यांसारख्या पोटाच्या तक्रारींवर याचे सेवन करणे फायद्याचे ठरेल. यासाठी तुम्ही कोमट पाण्यात दालचिनी पावडर, मध यांना मिक्स करुन प्यावे.
  • मध आणि दालचिनी पावडर कोमट पाण्यासोबत रोज सकाळी आणि संध्याकाळी नियमित खावी. याच्या सेवनाने वेदना आणि सूज कमी होते.
  • ऍटी-फंगल गुणधर्मांनी परिपूर्ण असे मध आणि दालचिनी हे पदार्थ आहेत. तुम्हाला कोणतेही फंगल इन्फेक्शन झाले असेल तर मधासोबत दालिचिनी पावडर खावी.
  • मधासोबत दालचिनी खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तुम्ही मध आणि दालचिनीची चहा दररोज पिऊ शकता.
  • मध आणि दालचिनी पावडरचे पाणी प्यायल्याने शरीरातील कॅन्सर सेल्सची निर्मिती होण्यापासून रोखता येते. तुम्ही जर नियमित मध आणि दालचिनी पावडरचे पाणी प्यायलात तर कॅन्सरचे सेल्स वाढण्याचा धोका कमी होतो.
  • शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मध आणि दालचिनीचे पाणी प्यावे. या पाण्याने हृदयरोगाचा धोका टाळता येतो.
  • जर वारंवार युरिनरी इन्फेक्शनचा त्रास असेल तर दालचिनी आणि मधाचे सेवन करावे. युरिनरी इन्फेक्शनचा त्रास हा महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini