Sunday, March 16, 2025
HomeमानिनीHoneymoon Destination : हनीमूनला जायचंय? मग देशातील हे मिनी मालदिव बेस्ट

Honeymoon Destination : हनीमूनला जायचंय? मग देशातील हे मिनी मालदिव बेस्ट

Subscribe

लग्नानंतर कपल्सची ऑफिशअल ट्रिप म्हणजे हनिमून. ही ट्रिप दोघांसाठी एकदम खास असते. लग्नानंतर हनिमून हे नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी दगदगीतून निवांत होण्यासाठी आणि नव्या नात्याला वेळ देण्यासाठी गरजेचे मानले जाते. हल्ली तर हनिमून म्हणजे परदेशी जायचं असा ट्रेंड सुरू आहे. पण, असे असले तरी हनिमूनसाठी आपल्या देशातही कित्येक सुंदर ठिकाणे आहेत, जेथे तुम्ही जोडीदारासोबत हनिमूनला जाऊ शकता. परदेश प्रवास आणि त्यासाठी लागणारा खर्च, वेळही यामुळे वाचू शकेल. आज आम्ही तुम्हाला असे ठिकाण सांगणार आहोत, ज्याला भारतातील मिनी मालदिव असे म्हटले जाते.

उत्तराखंडमधील मिनी मालदिव –

उत्तराखंडमध्ये हे मिनी मालदिव आहे. येथील एका ठिकाणाला मिनी मालदिव म्हटले जाते. येथे जाऊन तुमची मालदिवला जाण्याची आणि परदेशी हनिमूनला जाण्याची इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकते. अनेक कप्लसची मालदिवला एकदा तरी जावे, अशी इच्छा असते. येथे जाऊन तुम्ही कमी वेळात आणि बजेटमध्ये मालदिवचा आनंद घेऊ शकता.

उत्तराखंडमधील मिनी मालदिव हे पर्यटकांसाठी कायमचं आकर्षण राहिले आहे. येथे तरंगती घरात राहण्याचा अनुभव तुम्हाला घेता येईल, ज्याला फ्लोटींग हाऊस असे म्हटले जाते. टिहरी धरणावरील या फ्लोटींग हाऊसमध्ये जोडीदारासोबत प्रत्येक क्षणाचा तुम्हाला अनुभव घेता येईल. येथे अनेक वॉटर अॅक्टिव्हिटी सूद्धा आहेत. जसे की, बोटींग, पॅरोसेलिंग अशा अॅक्टिव्हिटींचा आनंद घेता येईल. तुम्ही आणि तुमचा पार्टनर जर निसर्गप्रेमी असाल तर येथे नक्की भेट द्या.

कसे जाल ? 

मिनी मालदिवमधील फ्लोटिंग हाऊसमध्ये राहण्यासाठी तुम्हाला 5 ते 6 हजार खर्च करावा लागेल. येथे तुम्हाला खाण्याचीही सोय मिळेल. येथे जाण्यासाठी तुम्हाला तीन मार्गांनी जाता येईल. तुम्ही हवाई, रेल्वे आणि बाय रोडही जाऊ शकता.

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini