घरलाईफस्टाईलहॉट लूक - डेनिम

हॉट लूक – डेनिम

Subscribe

निसर्गदत्त सौंदर्य सर्वांना लाभलं नसलं तरी प्रत्येक जण अधिक छान दिसण्याचा प्रयत्न निरनिराळ्या फॅशन, आऊटफिटस घालून करत असतो.

वेगवेगळ्या फॅशनची, स्टाईलची जीन्स कॉलेजमधील तरूण-तरूणींसाठी फेव्हरिट असते. कारण इतर कपड्यांपेक्षा जीन्समध्ये जास्त व्हरायटी आणि नावीन्य असते आणि तितकेच जीन्समध्ये कम्फर्टेबल वाटते. हॉट लूक मिळवण्यासाठी जीन्स हा एक परफेक्ट आऊटफिट आहे.

जीन्स ही प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीला घालायला आवडते, मग तो कॉलेजियन क्राऊड असो अथवा घर, ऑफिसपासून कोणत्याही समारंभात आढळणारी जीन्स ही युवकांच्या कपड्यातील अविभाज्य भाग बनत चालला आहे. जीन्स म्हणजे आजच्या तरूणाईचं आवडतं वेअरिंग. एक तर जीन्स-टी शर्ट वर हटके लूक येतोच. तसेच जीन्स दणकट असल्यानं कसंही हवं तेव्हा वापरता येतं. टिकाऊपणा-रफ अ‍ॅण्ड टफ आणि वाईल्ड लूकमुळे ती तरुणांबरोबर इतरांमध्येही लोकप्रिय आहे. तसेच तिच्यात अधिक धूळ, डाग सहन करण्याचे गुणधर्म असतात. ओव्हर फेडेड, स्लिमफीट, पेन्सिल बॉटम, क्वील्स, ग्रील्स शर्ट्सची क्रेझ आहे. अशा फॅशनेबल जीन्सची जादू आहे.

- Advertisement -

फॅशनच्या युगात जीन्स असा एक पेहराव आहे की कधी आऊटडेटेड होत नाही. कितीही जुनी किंवा बोअर वाटली तरी फॅशन प्रेमींमध्ये जीन्सची क्रेझ अजूनही कायम आहे. दररोज कॉलेजला जाताना इस्त्री करण्यात वेळ जातो म्हणून त्यावरील उत्तम उपाय म्हणून जीन्सचा वापर होतो. जीन्सला तशी कुठं रोज इस्त्री करावी लागते. जीन्समध्ये हायवेस्ट, मीड वेस्ट हे प्रकार तर फेव्हरेट होतेच, मात्र लो वेस्ट जीन्सनेही तरुणांमध्ये जादू केली आहे. जीन्स सोबत शर्ट, टी शर्ट, शॉर्ट शर्ट, कुर्ता नवा लूक देतं. पूर्वी पावसाळ्यात जीन्स कपाटात ठेवली जायची, मात्र आता पावसाळ्यातही ऑल टाइम फेव्हरिट जीन्सचं आहे. यात हॉट पॅन्टस, थ्री फोर्थ्स, शॉर्ट पॅन्टस, स्कर्टस ही उपलब्ध आहेत. यामुळे येणारा फंकी, ट्रेंडी लूकही तरुणाईच्या पसंतीस पडत आहे.

डेनिम, कार्गो, लुझर्स ली, लिवाईस, स्पायकर यांसारख्या कित्येक ब्रँडसच्या जीन्सची मागणी जास्त आहे. तरुणांसाठी जीन्स हा खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. जीन्समध्ये कोणता प्रकार घ्यायचा हे ओकेजन प्रमाणे ठरते. कॉलेजमध्ये वापरण्यासाठी स्पायकर, डेनिम, तर प्रवासासाठी कार्गो, सिक्स पॉकेट. ब्रँडेड जीन्सची किंमत जास्त असली तरी ती टिकण्यास चांगली असते. जीन्स कधीही, कुठेही, कुठल्याही प्रसंगासाठी वापरण्यायोग्य असल्याने हिला पसंती मिळते. जीन्समधील इनफॉर्मलपासून कॅज्युअल वेअरपर्यंत भरपूर प्रकार उपलब्ध आहे. तरुण वर्गात जीन्स महत्त्वाची बनत चालली आहे हे नाकारता येणार नाही. जीन्स-टी शर्ट-हाफ वा फूल जॅकेट, टाइट पोनी विथ डेलिकेट इयरिंग्ज. . सो बी रेडी टू रॉक!!!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -