आपण तज्ञमंडळीकडून वारंवार ऐकत असतो की, ऍल्युमिनियम फॉइल आरोग्यासाठी योग्य नाही. विशेष करून जेव्हा गरम किंवा आंबट पदार्थ पॅक करण्यासाठी ऍल्युमिनियम फॉइल वापरले जाते तेव्हा आरोग्याच्या समस्या सुरू होण्याची दाट शक्यता सांगितली जाते. कारण गरम आणि आंबट पदार्थ फॉइलमध्ये गुंडाळल्याने ऍल्युमिनियमचे कण पदार्थांत मिसळू शकतात, जे शरीरासाठी हानिकारक ठरते. पण, शरीरासाठी हानिकारक असणारे ऍल्युमिनियम फॉइल औषधांच्या पॅकेजिंगमध्ये का वापरले जाते? साधारणपणे हा प्रश्न सर्वांना सतावतो. औषधांमध्ये ऍल्युमिनियम फॉइल सुरक्षित का मानले जाते जाणून घेऊयात,
ऍल्युमिनियम फॉइलचे दुष्परिणाम –
- जेव्हा आपण गरम किंवा आंबट पदार्थ ऍल्युमिनियम फॉइलमध्ये पॅक करतो तेव्हा ऍल्युमिनियम फॉइलता काही भाग गळून पदार्थांत मिक्स होतो. ज्याचा थेट परिणाम मेंदू आणि हाडांवर होतो.
- ओव्हनमध्ये ऍल्युमिनियम फॉइल वापरल्याने त्याचे कण अन्नात मिक्स होतात, जे शरीरात बराचवेळ साचतात आणि शरीराच्या तक्रारी सुरू होतात. शरीरात ऍल्युमिनियम फॉइलचे कण साचल्याने न्यूरोलॉजिकल समस्या सुरू होतात.
- ऍल्युमिनियम हा हलका धातू असला तरी शरीरात साठल्याने त्याचा थेट परिणाम किडनीवर होऊ शकतो.
औषधांसाठी ऍल्युमिनियम फॉइल बेस्ट का?
ओलावा, ऑक्सिजन, प्रकाश आणि बॅक्टेरियापासून औषधांचे संरक्षण करण्यासाठी ऍल्युमिनियम फॉइल सर्वात बेस्ट ऑपश्न आहे. जर औषधे प्लास्टिक किंवा इतर कोणत्याही साहित्यात पॅक केल्यास लवकर खराब होण्याचे शक्यता अधिक असते. औषधांच्या पॅकिंगमध्ये ऍल्युमिनियम फॉइलचा वापर अन्न व औषध प्रशासन आणि WHO जागतिक आरोग्य संघटनेने पूर्णपणे सुरक्षित मानला आहे.
ऍल्युमिनियम फॉइल वापरताना घ्या ही काळजी
- ऍल्युमिनियम फॉइलमध्ये जास्त वेळ गरम किंवा आंबट पदार्थ ठेवू नयेत.
- ओव्हनसाठी जर फॉइल वापरत असाल तर विशिष्ट तापमानासाठी डिझाइन केलेले फॉइल पेपर वापरावेत.
हेही पाहा –