Thursday, June 8, 2023
घर मानिनी Health pregnancy Tips : गर्भवती महिलांनी काळा चहा पिणे कितपत फायदेशीर ?

pregnancy Tips : गर्भवती महिलांनी काळा चहा पिणे कितपत फायदेशीर ?

Subscribe

गर्भवती महिलांनी योग्य प्रमाणात काळा चहा घेतल्यास आरोग्यास त्याचा चांगला परिणाम होतो.

गरोदर महिलांनी कोणत्या गोष्टी खाव्यात आणि किती प्रमाणात खाव्यात हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. अशातच गरोदरपणात चहा पिणे कितीपत योग्य यावरअजूनही ठाम उत्तर सांगता येत नाही. कोणी म्हणतं चहा पिणे वाईट तर कोणी म्हणते चहा पिण्याने फायदा होतो. काही जण म्हणतात कमी चहा प्यावा, तर काही जण म्हणतात जास्त चहा प्यावा. पण आज या प्रश्नांचा मागोवा आपण घेणार आहोत, तसेच आपण चहा कशाप्रकारे सेवन करावा किंवा कितपत घ्यावा हे जाणून घेणारा आहोत.
green tea when pregnant | Is It Safe to Drink Green Tea While Pregnant?
गर्भवती महिलांनी चहाचे असे करा सेवन ज्यामुळे शरीराला आराम मिळेल-
  • काळा चहा पिल्याने मधुमेहाचा त्रास होत नाही.
  • काळा चहामध्ये असलेले पॉलीफनॉल्समुळे प्रतिकारशक्ती सुधारते.
  • काळा चहाच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. पोटाचे विकार होत नाही.
  • हाडांच्या बळकटीसाठीही काळा चहा फायदेशीर ठरतो.
  • गर्भअवस्थेत वजन नियंत्रण ठेवण्यासाठी काळा चहा उपयोगी आहे.
  • गरोदरपणात होणारी मळमळ आणि उलटीची समस्या दूर करण्यासाठी काळा चहाचे प्रमाणात सेवन करावे.
  • गर्भवती महिलांना लगेच दम लागतो यामुळे काळा चहा प्यायल्याने आरामदायी वाटते.
  • जास्त प्रमाणात काळा चहा पिऊ नये यामुळे देखील बाळाला त्रास होऊ शकतो.
  • जर मनात शंका असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच काळा चहा घ्यावा.

हेही वाचा :

जगातील पहिलीच घटना, गर्भातील बाळाची केली ब्रेन सर्जरी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini