नाश्ता किंवा लंच ऐवजी ‘ब्रंच’ करण्याचा नवा ऑप्शन किती फायदेशीर ? जाणून घ्या

सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण यांच्या मधल्या वेळेत जातो आहार घेतला जातो त्याला 'ब्रंच' असे म्हणतात. दिवसागणिक 'ब्रंच' (brunch) चं प्रमाण वाढत चाललं आहे.

डॉक्टर किंवा तज्ज्ञ नेहमी सल्ला देतात, की सकाळी केलेला नाश्ता आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. सकाळी पोटभर नाश्ता केल्याने शरीरात दिवसभर एनर्जी टिकून राहते. पण काही वेळेस किंवा विकेंडला(week end) जास्त लोकांचा मूड हा आराम करण्याचा असतो. त्यामुळे अनेक जण हेव्ही ब्रंच चा पर्याय निवडतात. पण खरंच नाश्ता कारण्याऐवजी ब्रंच करण्याचा ऑप्शन योग्य आहे का त्याने योग्य ते प्रोटिन्स मिळतात का?
सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण यांच्या मधल्या वेळेत जातो आहार घेतला जातो त्याला ‘ब्रंच’ असे म्हणतात. दिवसागणिक ‘ब्रंच’ (brunch) चं प्रमाण वाढत चाललं आहे.

हे ही वाचा – कॉफी आणि व्यक्तिमत्त्व, काय आहे नातं? जाणून घ्या…

सकाळचा नाश्ता आवश्यक असतो

सकाळचा नाश्ता राजाप्रमाणे करावा, दुपारचं जेवण सामान्य माणसाप्रमाणे असावं आणि रात्रीचं जेवण गरिबाप्रमाणे करावं असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. सकाळी पोटभर केलेला नाश्ता दिवसभर शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतो. त्यामुळे शरीराला पोषक घटक मिळतात. आदल्या दिवशी रात्रीच्या जेवणानंतर शरीरात अन्न जात नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी नाश्ता करणे गरजेचे असते. रोज सकाळी योग्य आणि पौष्टिक नाश्ता केलाच पाहिजे. ते तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.

हे ही वाचा – Receipe : पावसाळ्यात घ्या गरमागरम टोमॅटो सूपचा आस्वाद

‘ब्रंच’ केल्यामुळे नाश्त्याची भरपाई होते का ?

अनेकदा विकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी लोक ‘ब्रंच'(brunch) चा पर्याय निवडतात. पण ‘ब्रंच’ करणं खरंच फायदेशीर ठरतं का असा प्रश्न सुद्धा अनेकदा पडतो. जरी तुम्ही ‘ब्रंच’ करत असलात तरी त्यात अश्या अन्न पदार्थांचा समावेश नक्की करा की ज्या पदार्थांच्या सेवनाने तुम्हाला जास्तीत जास्त पोषक घटक मिळतील. ‘ब्रंच’ सुद्धा फायदेशीर ठरू शकतं पण त्यात योग्य अन्न पदार्थांचा समावेश असला पाहिजे.

हे ही वाचा –  पावसात भिजण्यापूर्वी केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ टिप्सचा नक्कीच उपयोग होईल

या गोष्टी लक्षात ठेवा

– ‘ब्रंच’ म्हणजे एक हेव्ही आहार आहे ज्याचे सेवन तुम्ही झोपेतून उठल्यावर २ तासांच्या आत करणे आवश्यक आहे.

– ‘ब्रंच'(brunch) मध्ये नेहमी भाज्या, फळे आणि ड्रायफ्रूटचा समावेश करणे अधिक फायदेशीर ठरते.

– जर का तुम्ही प्रत्येक दिवशी पाच कप फळं आणि भाज्या खात असाल तर ‘ब्रंच’ करताना कमीत कमी एक कप फळं आणि भाज्या खाण्याचा प्रयत्न करा. पण भरपूर पोषण युक्त फळांचा अनिता भाज्यांचा समावेश असू द्या

– जर का तुम्ही काही वेळा ‘ब्रंच’ बाहेरून ऑर्डर करण्याचा विचार करत असाल तर तसे करू नका, शक्यतो ‘ब्रंच’ घराच्या घरी बनवून खाण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून पोह्स्क घाटकी मिळतील.

हे ही वाचा –   Recipe : उपवासात साबुदाण्याचे चटपटीत थालीपीठ नक्की ट्राय करा

– उत्तम आहार घेतला तर तो मेंदूला उत्तम पणे ग्लूकोज चा पुरवठा करतो.

A brunch spread at a hotel with waffles, sausage, blueberries, chocolate covered strawberries.

– ‘ब्रंच'(brunch) करताना नेहमी एका गोशस्तीची काळजी घ्या की तुमच्या शरीरात योग्य आणि प्रोटीनने भरपूर असे अन्न पदार्थ तुमच्या शरीरात जातील.

योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात केलेले ब्रंच हे नेहमीच फायदेशीर ठरते. त्यात योग्य आहाराचा समावेश असणं गरजेचं असतं. पण जरा का ब्रंच योग्य प्रमाणात केले जात नसेल तर सकाळच्या नाश्त्यावर भर देणे गरजेचे आहे.