Thursday, March 27, 2025
HomeमानिनीStomach Health : पोट खराब झालंय ?

Stomach Health : पोट खराब झालंय ?

Subscribe

बदलती लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे पोट बिघडणे ही एक सामान्य समस्या झाली आहे. पोट बिघडल्याने गॅस होणे, पोट फुगणे या तक्रारींनी नकोसे व्हायला होते. अशावेळी आपण डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी दिलेली औषधे घेतो. केमिकलयुक्त औषधे परिणाम करतातही. पण, सतत पोट खराब होत असेल तर अशी औषधांची सवय शरीराला लावणे योग्य नाही. अशा परिस्थितीत खराब झालेले पोट शांत करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय नक्कीच करू शकता. आजच्या या लेखात जाणून घेऊयात वारंवार बिघडणाऱ्या पोटावर काही घरगुती उपाय

ऍप्पल सायडर व्हिनेगर –

जर तुमचे पोट वारंवार बिघडत असेल तर ऍप्पल सायडर व्हिनेगर खूप उपयुक्त ठरू शकते. यात पुरेशा प्रमाणात पेक्टिन असते, जे पोटदुखी आणि क्रॅम्प्सपासून आराम देते. पोटातील संसर्ग दूर करण्यासाठी ऍप्पल सायडर व्हिनेगर प्रभावी उपाय आहे. जर पोट बिघडले असेल तर एक ग्लास पाण्यात 1चमचा ऍप्पल सायडर व्हिनेगर मिसळून प्यावे, नक्कीच आराम मिळेल.

आलं –

आल्यामध्ये ऍटीफंगल आणि ऍटी-बॅक्टेरियल घटक आढळतात. आल्याच्या सेवनाने पोटदुखी कमी होते. यासह पोट खराब झाले असल्यास एक चमचा आल्याची पावडर दुधात मिसळून प्यावी.

दही –

जर पोटात बिघाड झाला असेल तर दही खावे. दह्यातील बॅक्टेरिया पोट शांत करण्यास फायदेशीर असतात. दह्याच्या सेवनाने पोटदुखी बरी होते आणि शरीरात थंडावा निर्माण होतो.

केळी –

जर तुमचे पोट वारंवर खराब होत असेल तर केळी तुम्ही खायला हवीत. केळीतील पेक्टिन पोट शांत करण्यास फायदेशीर असतात. याशिवाय यातील पोटॅशियम एकूण शरीरासाठी फायदेशीर आहे.

गाजराचा रस –

पोट सतत बिघडत असेल तर गाजराचा रस प्यावा. बिघडलेले पोट शांत करण्यासाठी गाजराचा रस उत्तम पर्याय आहे.

जास्त पाणी प्यावे –

जर पोटाच्या समस्या वारंवार जाणवत असतील तर पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे हे कारण असू शकते. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे. जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करावे. तुम्ही भाज्यांचा किंवा फळांचा रस पिऊ शकता. लिंबू पाणी, मीठ साखरेचे द्रावण किंवा नारळपाणी उत्तम पर्याय आहे.

 

हेही वाचा :

Manini