घरताज्या घडामोडी'हे' उपाय करा आणि करोना व्हायरस रोखा

‘हे’ उपाय करा आणि करोना व्हायरस रोखा

Subscribe

कोरोनाला रोखण्यासाठी सोपे उपाय

जगभरात करोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. या करोनामुळे चीनमध्ये आतापर्यंत ३ हजार ५०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तसेच हा व्हायरस आता महाराष्ट्रात येऊन धडकला आहे. महाराष्ट्रातील संख्या आता ५ वर गेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकडून चिंता व्यक्त होत आहे. मात्र, तुम्हील स्वत:ची काळजी घेतली तर तुम्ही सहजरित्या या व्हायरसचा सामना करु शकता. चला तर जाणून घेऊया या करोना व्हायरसला रोखण्याचे उपाय.

तोंडाला रुमाल लावा

- Advertisement -

बाहेर जाताना तोंडाला रुमाल लावून बाहेर पडा. तसेच सर्दी, खोकला झाल्यास आपला संसर्ग होऊ नये यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यांनी मास्कचा वापर करा.

सातत्याने हात धुवा

- Advertisement -

दिवसभरातून सातत्याने साबणाने हात धुवा. यामुळे हातावरील विषाणूंच्या प्रतिबंधासाठी ते उपयोगी ठरते.

नाक, तोंड, डोळ्यांना सतत हात लावू नका

बऱ्याचदा नाक, तोंड आणि डोळे यांना सातत्याने हात लावला जातो. मात्र, हे हात लावणे टाळा. कारण नाक, तोंड आणि डोळ्यांना सतत हात लावल्याने हातावरील विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करु शकतात.

शिंकताना तोंडावर रुमाल ठेवा

शिंकल्यानंतर नाका-तोंडातून निघणाऱ्या तरल पदार्थांमध्ये अनेक बॅक्टेरिया असतात. त्यामुळे शिंकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवा.

सुरक्षित अंतर ठेवा

ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला असेल अशा व्यक्तींपासून सुरक्षित अंतर टेवा. किमान ३ फूट अंतर ठेवणे फार गरजेचे आहे.

सर्दी, खोकला आणि ताप याकडे दुर्लक्ष करु नका

जर तुम्हाला सर्दी, खोकला आणि ताप असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. तात्काळ डॉक्टरांकडे जा आणि योग्य तो सल्ला घ्या.

मोबाईल स्क्रिन स्वच्छ ठेवा

मोबाईलची स्क्रिन स्वच्छ ठेवा. तुमच्या मोबाईलच्या स्क्रिनला डिइन्फेटिंग वाइप्सने साफ करा. यामुळे मोबाईल वरील किटाणू मरतील.

बाथरुम स्वच्छ ठेवा

बाथरुम स्वच्छ ठेवा. तसेच बाथरुममध्ये प्लास्टिक पडद्यांचा वापर टाळा.

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

करोना हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

शक्यतो प्रवास टाळा

गरज असल्यास लांबचा प्रवास करा. अन्यथा लांबचा प्रवास करणे टाळा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -