Thursday, March 20, 2025
HomeमानिनीGardening Tips : या पद्धतीने कुंडीत लावा पुदिना

Gardening Tips : या पद्धतीने कुंडीत लावा पुदिना

Subscribe

दिवसेंदिवस वाढत जाणारा उन्हाचा तडाखा नकोसा झाला आहे. अशावेळी शरीराला थंडावा देणारे पदार्थ खाल्ले जातात. यात वाढत्या उकाड्यात कुठल्याही पदार्थात थंडावा निर्माण करण्यासाठी पुदिना सर्रासपणे वापरला जातो. उन्हाळा आला असल्याने पुदिन्याचे भाव वाढले आहेत. अशावेळी तुम्ही घरातच पुदिन्याची लागवड करू शकता, ज्यामुळे पुदिना संपल्यावर बाजारातून पुदिना आणण्याची गरज भासणार नाही आणि पैसेही वाचतील. काही महिला पुदिन्याची लागवड घरात करतात. पण क्षुल्लक कारणांमुळे कुंडीत लावलेले पुदिन्याचे रोप सुकते किंवा त्याला पानेच येत नाही. तुमच्याही बाबतीत असे घडले आहे का? त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कुंडीत पुदिना कसा लावायचा याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत

कुंडीत पुदिना लावण्यासाठी टिप्स – 

कुंडीची उंची –

पुदिन्याला पाने भरपूर येतात. त्यामुळे कुंडी साधारण 6 ते 10 इंच असावी.

माती –

पुदिन्यासाठी योग्य दर्जाची माती निवडावी.

मातीचे प्रमाण –

यासह जेवढा कुंडीचा आकार असेल तेवढी माती घ्यावी.

खत –

पुदिन्यासाठी फळांच्या सालींपासून बनवलेल्या खताचा वापर करावा. यामुळे यातील पोषकतत्वे पाने हिरवी आणि निरोगी ठेवतील.

नियमित कापणी –

पुदिना व्यवस्थित वाढण्यासाठी रोपाची नियमित छाटणी करावी. यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि रोप व्यवस्थित वाढते.

पाणी –

पुदिना लावलेली माती सुकु न देणं सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे कुंडीत ठिबकने पाणी तुम्ही द्यायला हवे.

मातीत ओलावा टिकवावा –

पुदिन्याच्या रोपाला पाणी देण्यासोबतच मातीत ओलावा राहील याची काळजी घ्यावी. यामुळे पाने चांगली फुटतात.

खताचे पाणी –

पुदिन्याच्या रोपाला दर पंधरा दिवसांनी खतांचे पाणी द्यायला विसरू नये. यामुळे पुदिना दाट वाढतो आणि रोपाला भरपूर पाने येतात.

 

 

 

हेही पाहा –

Manini