घरलाईफस्टाईलसाबणाचा शोध लागण्यापूर्वी महिला कपडे कसे धुवायच्या?

साबणाचा शोध लागण्यापूर्वी महिला कपडे कसे धुवायच्या?

Subscribe

तुमचे कपडे घाण झाले तर तुम्ही बाजारातून आलेले साबण किंवा कपडे धुण्याची पावडर वापरून ते स्वच्छ करतात. आज काल बाजारात कपडे स्वच्छ आणि सुगंध येण्यासाठी अनेक लिक्विड देखील वापरले जाते. परंतु, कपडे धुण्याची पावडर आणि साबण हे अस्तित्वात येण्यापूर्वी भारतात घाण कपडे कसे स्वच्छ केली जात होती, हे माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत.

भारतात पहिल्यांदा साबणाची फॅक्ट्री ही 1897 मध्ये मेरठमध्ये स्थापन केली गेली. परंतु, साबण अस्तित्वात येण्यापूर्वी भारतीय लोक हे ऑर्गेनिक गोष्टींचा वापर करून कपडे स्वच्छ करत होते. रीठाचा सर्वात जास्त वापर केला जात होता.  कपड्यावरील घाण, महाग आणि मऊ धुण्यासाठी रीठाचा वापर होत होता. रीठाच्या झाडाच्या सालने खूप फेस होत होता आणि कपड्यावरील घाण देखील निघून ते स्वच्छ होतात.

- Advertisement -

रीठाचा असा करा वापर

रीठाचा वापर हा महाग आणि मऊ कपडे धुण्यासाठी केला जातो. पहिल्यांदा रेठाची फळे पाणी घालून गरम केल्यानंतर रीठामध्ये फेस येतो. तो फेस काढून कपड्यवर लावायचा आणि कपडे दगड रिंवा लाकडावर घासून पॉलिश केले जातात. यामुळे कपड्यांची घाण तर साफ झालीच, शिवाय ते जंतूमुक्तही झाले. रीठा सेंद्रिय असल्याने त्याचा शरीरावर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही.

- Advertisement -

रेहनेही कपडे धुतले जातात

जुन्या काळात रेहचा वापर करून कपडे धुतले जातात. रेह हे एक प्रकारचे खनिज आहे. ज्यामध्ये सोडियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम सल्फेट असते. ही पांढऱ्या रंगाची पावडर पाण्यात मिक्स करून त्यात कपडे भिजवायचे आणि नंतर काही वेळाने कपडे घासून स्वच्छ करून घ्यावे.


हेही वाचा – भारतातील छोट्या शहरातून अमेरिकेत पोहोचणाऱ्या यामिनी रंगनची सक्सेस स्टोरी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -