मराठी बोलीभाषेत तुम्ही अनेकदा अमूक तमुक व्यक्तीच्या नावाने बोटे मोडली असे ऐकलेच असेल. ही बोटं मोडण्याची सवय वाईट असे घरातील मोठी मंडळी आपल्याला अनेकदा सांगतात. काही जण स्ट्रेस असल्यावर तर काही रिकाम्या वेळीही बोटे मोडतात. अंगवळणी पडलेली ही सवय आपण काय सोडत नाही. खरं तर, अनेकांचा असा समज असतो की, बोटे मोडल्याने हात आणि पाय दुखण्यापासून आराम मिळतो. आराम मिळत असला तरी हाडांसाठी आणि सांध्यासाठी बोटे मोडण्याची सवय हानिकारक ठरू शकते. वारंवार बोटे मोडल्याने तुम्ही हाडांच्या गंभीर आजाराचे बळी देखील ठरू शकता.
बोटे मोडल्यास होते काय?
डॉक्टरांच्या मते, हाडे आणि सांध्यामध्ये एक विशेष द्रव असतो, जो हाडांना जोडण्याचे काम करतो. याशिवाय हाडे एकमेकांवर घासण्यापासून रोखण्यासाठी देखील कार्य करतो. या द्रव्यात असलेले कार्बन डायऑक्साइड नवीन जागा तयार करते, ज्यामुळे तेथे बुडबुडे तयार होतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही हाडे मोडलीत तर हे बुडबुडे फुटू शकतात. ज्यामुळे संधिवात होण्याची शक्यता असते.
या समस्यांचा धोका –
- बोटे मोडण्याच्या सवयीमुळे ऑस्टियोआर्थराटिससारख्या हाडांच्या समस्या उद्भवू शकतात.
- वारंवार मोडण्याची सवय हाडे झिजण्याला कारणीभूत ठरते.
- बोटे मोडण्याच्या सवयीमुळे बोटांचा आकार बदलू लागतो.
- सततच्या या सवयीमुळे हाडांमधील वंगण कमी झाल्याने त्यातून टकटक असा आवाज येऊ लागतो, जे योग्य नाही.
अशी सोडवा सवय –
- बोटे मोडण्याची इच्छा झाल्यास दोन्ही हात लांब करावेत आणि हातांच्या बोटांची उघडझाप करावी. यामुळे हळूहळू बोटे मोडण्याची सवय कमी होईल.
- फावल्या वेळेत बोटे मोडण्याची सवय असल्यास बोटांना कामात व्यस्त ठेवावेत. तुम्ही एखादे काम करू शकता. जसे की, विणकाम,शिवणकाम,लिखाण करू शकतात.
- बोटं मोडण्याची सवय तुटण्यासाठी हातात सतत काहीतरी वस्तू ठेवावी.
हेही पाहा –