Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल अपुऱ्या झोपेमुळे होतात 'हे' पाच परिणाम

अपुऱ्या झोपेमुळे होतात ‘हे’ पाच परिणाम

Related Story

- Advertisement -

आपल्या मेंदूनं व्यवस्थित काम करावं यासाठी आठ तास झोप मिळण्याची गरज असते. मात्र हल्ली बऱ्याच कारणांनी झोप अपुरी राहते. त्याचे परिणाम हळूहळू दिसायला सुरुवात होते. बदललेली शैली, कामाच्या वेळा, असणारा ताणतणाव, मोबाईल अथवा गॅझेट्सचा अतिवापर या सगळ्यामुळे सध्या झोप कमी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अपुरी झोप अर्थात निद्रानाश. यामुळे आरोग्यावर अतिशय विपरित परिणाम होतात. झोप न येण्याची कारणं काहीही असली तरी त्याचा मेंदूवर नकारात्मक परिणाम होत असतो. जाणून घेऊया काय होतात अपुऱ्या झोपेचे परिणाम?

१. मेंदूच्या कार्यावर होतो परिणाम – पुरेशी झोप मिळत नसल्यामुळे, कोणत्याही गोष्टीकडे लक्ष केंद्रीत करण्याची अर्थात मन एकाग्र करण्याची क्षमता कमी होते. याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर होतो. पण ८ तास झोप मिळाली तर तुम्ही पूर्ण दिवस आनंदी आणि तरतरीत राहू शकता.

- Advertisement -

२. सतत मूड बदलत राहतो – कमी झोप मिळाल्यामुळे एका क्षणात हसणं तर दुसऱ्याच वेळी उदास होणं अशा तऱ्हेनं जर तुमचा मूड सतत बदलत राहतो. काळजी, ताण, नैराश्य, सतत विचार करणं या कारणांमुळे तुमचा मूड सतत बदलू शकतो. या सगळ्या गोष्टींमुळे झोप पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम शरीरावर होतो.

३. अपुऱ्या झोपेमुळे जडतात रोग – सतत विचार, चिंता आणि वैताग यामुळे झोप अपुरी होते. त्यामुळे ह्रदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा, निराशा असे रोग तुम्हाला जडतात. एकदा हे रोग जडले की, तो बरा होणं शक्य नसतं. त्यामुळे रोज आठ तास झोप मिळालीच पाहिजे याची काळजी घ्यावी.

- Advertisement -

४. स्मरणशक्तीवर होतो परिणाम – अपुऱ्या झोपेमुळे स्मृतीभ्रंश अर्थात स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे विचार करण्याच्या शक्तीवर मर्यादा येतात. या सगळ्याचा परिणाम सकारात्मक विचारसरणीवरदेखील होतो. एखादी गोष्ट शिकण्याची तुमची क्षमता खालावत जाते. स्मरणशक्ती कमी झाल्यामुळे एकाग्रतेवरदेखील परिणाम होतो.

५. मनोविकार उद्भवू शकतात – अपुरी झोप ही गंभीर समस्या आहे. मात्र लोक त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत. त्यामुळे अतिविचार करून मनोविकार उद्भवतात. याकडे वेळेवर लक्ष देऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
एखादी गोष्ट शिकण्यासाठी, आरोग्याच्या समस्या आणि सायकायट्रिक डिसऑर्डर्स टाळण्यासाठी शांत आणि पुरेशा झोपेची आवश्यकता आहे.

- Advertisement -