Thursday, February 22, 2024
घरमानिनीHealthफ्रिजमध्ये अंडी किती दिवस फ्रेश राहतात?

फ्रिजमध्ये अंडी किती दिवस फ्रेश राहतात?

Subscribe

अंड्यामुळे शरीरात ऊब निर्माण होते. त्यामुळे हिवाळ्यात अंड्याचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते. या काळात अनेकजण पूर्ण अंड्याचा क्रेटच घरी आणून ती फ्रिजमध्ये ठेवतात. अंडी फ्रिजमध्ये ठेवल्याने ती फ्रेश राहतात असे आपल्याला वाटते. मात्र, अंडी फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

अंडी फ्रिजमध्ये ठेवणं योग्य की अयोग्य?

Protein Content in Egg: How Much Protein in 1 Egg Find the Complete Nutrition Facts

- Advertisement -
  • बाहेर ठेवण्यात आलेली अंडी 8 ते 10 दिवस चांगली राहू शकतात. मात्र, फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी 30 ते 40 दिवस चांगली राहू शकतात. पण फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी खाणे आपल्या स्वास्थ्यासाठी हानिकारक ठरु शकतात.
  • अंड्यामध्ये ओमेगा 3 फॅटी एसिड त्याचबरोबर पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, सोडीयम यांसारखे महत्त्वाचे घटक असतात. त्याचबरोबर व्हिटिमिन्स 6 आणि 12 असतात. मात्र, अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर त्यातील हे सर्व घटक अंड्यातून कमी होतात.

Do eggs need to be refrigerated? Yes, and here's why. - The Washington Post

  • बऱ्याचदा फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी आपण उकडण्यासाठी ठेवतो. मात्र, फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी उकडताना ती अंडी फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी उकडण्यापूर्वी थोडा वेळ बाहेर काढून ठेवावी.
  • त्याचप्रमाणे फ्रिजमध्ये ठेवलेली अंड्यांमध्ये बॅक्टेरिया जमा होऊ शकतात. त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेले अन्य पदार्थही खराब होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर अंड्यांची चवही बदलते.

Should You Refrigerate Eggs?

- Advertisement -
  • जर तुम्ही रोज अंडी खात असाल तर शक्यतो फ्रेश अंडी खा. बराच काळ फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी खाणे टाळा.
  • फार काळ फ्रिजमध्ये ठेवलेल्या अंड्यांच्या पदार्थांची चवही बदलते. अंडी उकडताना ते फुटणार नाही याकडे विशेष लक्ष द्या. खराब अंड्याचा आपल्या किडणी आणि ह्रदयावर गंभीर परिणाम होतो.

हेही वाचा :

नैसर्गिकरित्या वजन वाढवायचंय? तूप आणि गुळाचे करा सेवन

- Advertisment -

Manini