अंडी आरोग्यासाठी नेहमीच चांगले मानले जाते. काही लोकांना उकडलेली अंडी तर काहींना ऑम्लेट खायला आवडते. अंड्यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक तत्वे असतात, त्यामुळे याला सुपरफूड असेही म्हणतात. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज अंडी खाणे फायदेशीर ठरते. तुम्हीही जर उकडलेली अंडी दररोज खात असाल तर, अंड उकडल्यानंतर किती वेळात खाल्लं पाहिजे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
उकडलेले अंडे किती वेळात खाल्लं पाहिजे?
- जास्त उकडलेली अंडी तुम्ही 5 ते 7 दिवसांपर्यंत ठेऊ शकता आणि जर तुम्ही अंडी कमी उकडलीत, तर त्याला 2 दिवसांच्या आत खावे लागेल.
- बाहेर ठेवलेली अंडी 2 तास किंवा त्याहून अधिक काळ ठेवू नका. जर अंडी 2 तासांपेक्षा जास्त काळ बाहेर ठेवलेली असतील तर ती खाऊ नये.
- अंड्याचे शेल्फ उकडताना तुटले असेल तर ते 2-3 दिवसात खाल्लेच पाहिजे. अशी अंडी जास्त काळ साठवून ठेवू नयेत कारण त्यांचा PH बदलतो. आणि मग वास येऊ लागतो.
- अंडी उकडल्यानंतर थंड पाण्यात ठेवा. ते थंड झाल्यावर स्वच्छ कापडाने पुसूनच नंतर त्याचे पाणी चांगले सुकल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे अंड्यामध्ये कोणतेही बॅक्टेरिया राहत नाहीत.
उकडलेली अंडी फायदेशीर :
- जास्त उकडलेली अंडी प्रथिने आणि इतर पोषक घटकांचा चांगला स्रोत आहेत. आपण त्यातून एक सोपा स्नॅक आणि हलका-फुलका आहार देखील तयार करू शकता.
- अंड्यांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, जे शरीरासाठी खूप महत्वाचे असते. प्रथिने स्नायू तयार करतात, केस आणि नखे मजबूत करतात आणि शरीराला ऊर्जा देखील देतात.
- अंड्यांमध्ये असलेले ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन दृष्टी सुधारण्यास मदत करतात. या दोन्ही पोषक घटकांमुळे मोतीबिंदूचा धोकाही कमी होतो.
- अंड्यांमध्ये असलेले कोलीन मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोलीन स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता सुधारते.
Edited By : Nikita Shinde