घरी बनवा व्हेज चीज फ्रँकी

how make veg cheese frankie
घरी बनवा व्हेज चीज फ्रँकी

लहान असो किंवा मोठे फ्रँकी खायला सगळ्यांनाच आवडते. त्यातही आता तर फ्रँकी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये बनवण्याचा ट्रेंड आहे. पण प्रत्येकवेळी बाहेरून फ्रँकी न आणता घरच्या घरी टेस्टी फ्रँन्की बनवता येते. ती ही गव्हाच्या पोळीची.

साहित्य

गव्हाच्या ४ ताज्या पोळ्या, पाव कप बारीक चिरेलला कांदा, पाव कप किसलेला पनीर, दोन चमचे बारीक चिरलेली फरसबी, तीन चमचे बारीक चिरलेले फ्लॉवर, ३ चमचे बारीक चिरलेली गाजर, तीन चमचे बारीक चिरलेले मशरूम, १ चमचा बारीक चिरलेले आलं-लसूण, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, २ चमचे टोमॅटो केचअप, २ चमचे अमूल बटर, एक कप पुदीन्याची चटणी बनवून घ्या.

कृती

पोळ्या लालसर भाजून घ्या. बटर लावून एका बाजूला ठेवा. दुसरीकडे कढई किंवा पसरट भांड्यात बटर गरम करा. त्यात कांदा, आलं लसूण घाला. नंतर इतर भाज्या टाका. परतून घ्या. हळद टाका. पनीर व टोमॅटो टाकून भाज्या वाफेवर शिजवा. भाजी कोरडी करा. त्यावर किसलेले चीज टाका. नंतर पोळीला पुदिन्याची चटणी, टोमॅटो केचअप लावून त्यावर भाजी पसरवा. पोळीचा रोल करा. तव्यावर पुन्हा एकदा पोळीचा रोल लालसर भाजून घ्या. टेस्टी फ्रँकी तयार. बनवण्यासही सोपी आणि खाण्यास टेस्टी असण्याबरोबरच सर्व भाज्या यातून मुलांच्या पोटातही जातात. कधी कधी मुलं भाजी खायला कंटाळा करतात. अशावेळी मिक्स भाज्यांची फ्रँकी मुलांना द्यावी. ते ती चवीने खातात.


हेही वाचा – तेल न वापरता बनवा ‘टेस्टी फिश करी’