आपले शरीर 70% पाण्याने व्यापलेले आहे. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे महत्वाचे आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, थकवा आणि बद्धकोष्ठता यासारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तहान भागवण्यासाठी पाणी प्यायले जाते. पण, निरोगी राहण्यासाठी एका दिवसात किती पाणी प्यावे? या प्रश्नाचे उत्तर अनेकांना ठाऊक नसते. आज आम्ही तुम्हाला साधारणपणे एका दिवसात तज्ञांच्या मते किती लिटर पाणी प्यावे सांगणार आहोत.
पाण्याचे प्रमाण –
खरं, तर एका दिवसात किती पाणी प्यावे याबाबत वेगवेगळी मते असू शकतात. वय, वजन, तापमान, शारीरिक कष्ट, आहार, संपूर्ण आरोग्य या घटकांवर पाणी पिण्याचे प्रमाण अवलंबून आहे.
वयोगटानुसार पाण्याचे प्रमाण –
- 9-13 वयोगटातील मुलाने दिवसाला कमीत कमी 2.4 लिटर पाणी प्यावे आणि मुलींनी 2.1 लिटर पाणी प्यावे.
- 14 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांनी 3.3 लिटर आणि मुलींनी 2.2 लिटर पाणी प्यावे , असे सांगितले जाते.
- 19 ते 70 वयोगटातील पुरुषांनी 3.7 लिटर आणि महिलांनी 2.7 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
हिवाळ्यात किती पाणी प्यावे –
व्यक्तीने हिवाळ्यात 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. तुम्ही या दिवसात कोमट पाणी प्यायला हवे. थंड पाणी चुकूनही पिऊ नये.
पाणी न पिण्याचे दुष्परिणाम –
- पाणी कमी प्यायल्याने शरीर कमजोर होत जाते. पाण्याच्या कमतरतेमुळे थकवा वाढतो.
- पाणी कमी प्यायल्याने किडनीवर गंभीर परिणाम होतो.
- युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, किडनी स्टोन यासारख्या समस्या सुरू होतात.
- पाणी कमी प्यायल्याने त्वचेच्या समस्या उद्भवतात.
- पाणी कमी प्यायल्याने ड्राय माऊथची समस्या जाणवू शकते.
- तोंडातील लाळेचे प्रमाण कमी होते.
- सांधेदुखीचा त्रास जाणवत असेल तर पाणी कमी पिणे हे त्यामागील कारण असू शकते.
- पाणी कमी प्यायल्याने चेहऱ्यावरील तेज कमी होते.
- पाणी कमी प्यायल्याने लो बीपीचा त्रास संभवतो.
हेही पाहा –