Friday, September 29, 2023
घर मानिनी Religious Raksha Bandhan 2023 : भारताच्या विविध राज्यांत 'या' नावाने साजरी केले जाते...

Raksha Bandhan 2023 : भारताच्या विविध राज्यांत ‘या’ नावाने साजरी केले जाते रक्षाबंधन

Subscribe

श्रावण महिन्याची पौर्णिमा राखी पौर्णिमा या नावाने साजरी केली जाते. बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण अर्थातच रक्षाबंधन, भाऊ-बहिणीचे नाते घट्ट करणारा हा सण आहे. रक्षाबंधन म्हणजे रक्षा करण्याचं वचन प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला देतो. राखीपौर्णिमा जवळ-जवळ भारतातील प्रत्येक राज्यात साजरी केली जाते. मात्र या सणाला प्रांतानुसार वेगवेगळ्या नावाने ओळखली जातात. रक्षाबंधन हा सण इतर भागात कोणत्या नावाने साजरा केला जातो तसेच कश्या प्रकारे साजरा केला जातो. हे आज आपण जाणून घेणार आहोत.

अवनी अवित्तम

- Advertisement -

बाह्मणांसाठी हा दिवस विशेष महत्वाचा मानला जातो. केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि ओरिसा या दक्षिण भारतातील राज्यांमध्ये राखीपौर्णिमा अवनी अवित्तम म्हणून साजरी केली जाते. तसेच या दिवसाला उपकर्मम या नावाने देखील संबोधले जाते.

कजरी पौर्णिमा

मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगढ , बिहार या राज्यांमध्ये रक्षाबंधन हा सणाला भावा बहिणी प्रमाणेचं शेतकरी आणि मुलगा असलेल्या आईसाठी हा सण अत्यंत खास असतो. येथे श्रावणी किंवा कजरी पौर्णिमा म्हणून रक्षाबंधन म्हणून साजरी केली जाते.

- Advertisement -

नारळी पौर्णिमा

महाराष्ट्र, गुजरात, गोवा ,कर्नाटक या भारताच्या पश्चिमेकडील राज्यामध्ये रक्षाबंधनासोबतचं नारळी पौर्णिमेचा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो. जी लोकं समुद्रातून मिळणाऱ्या गोष्टीतून आपाला उदरनिर्वाह करतात. अशी लोकं समुद्राला नारळ अर्पण करुन नारळीपौर्णिमा मनोभावे साजरी करतात. यामुळे कोळी ,मच्छिमार या लोकांमध्ये या सण एखाद्या उत्सवाप्रमाणेचं साजरा केला जातो.

पवित्रपौर्णिमा

गुजरात राज्यामध्ये रक्षाबंधन या सणाला पवित्रपौर्णिमा असं म्हणतात. तसेच या खास दिवशी गुजरातमध्ये भगवान शंकराची पूजा केली जाते.


हेही वाचा : 

Raksha Bandhan 2023 : श्रावण पौर्णिमेला का साजरे केले जाते रक्षाबंधन?

- Advertisment -

Manini