घरलाईफस्टाईलव्हॅक्सिंग केल्यावर तुमच्या त्वचेवरही येतो पुरळ? मग 'हे' करा उपाय

व्हॅक्सिंग केल्यावर तुमच्या त्वचेवरही येतो पुरळ? मग ‘हे’ करा उपाय

Subscribe

व्हॅक्सिंग केल्यामुळे तुम्हालाही पुरळ, लालसरपणा आणि खाज येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. मग करा हे उपाय.

सुंदर दिसण्यासाठी अनेक तरुणी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल, हेअर कटिंग आणि इतरही ट्रिटमेंट घेत असतात. त्यातील एक प्रकार म्हणजे व्हॅक्सिंग. सध्या बऱ्याच तरुणी व्हॅक्सिंगही  करतात. मात्र, व्हॅक्सिंग करणे म्हणजे प्रचंड त्रासदायक असते. विशेषत: संवेदनशील त्वचा असणाऱ्यांना व्हॅक्सिंगमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो. तर बऱ्याचदा व्हॅक्सिंग केल्याने त्वचेवर बारीक पुरळ येणे, त्वचा लालसर होणे आणि खाज येणे अशा समस्या उद्भवतात, अशावेळी नेमके काय करावे. ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया काही घरगुती उपाय.

 

व्हॅक्सिंगनंतर त्वचेवर बारीक पुरळ येतो. अशावेळी हा पुरळ कमी करण्यासाठी घरगुती कोरफड जेलचा वापर करावा. जर तुमच्या घरी कोरफड नसेल तर मेडिकलमधील तयार कोरफड जेल लावावे. यामुळे त्वचेवर होणारी जळजळ कमी होते आणि थंडावा मिळतो.

- Advertisement -

नारळाचे तेल

पुरळ घालवण्यासाठी त्वचेवर नारळाचे तेल लावावे. तेलामधील पोषण तत्त्वांमुळे त्वचेवर येणारी खाज कमी होण्यास मदत होते.

 

टी ट्री ऑइल

त्वचेची जळजळ होत असल्यास टी ट्रीचा वापर करावा. यामुळे त्वचेची जळजळ कमी होण्यास मदत होते.

- Advertisement -

बर्फ

बर्फ हा एक सोपा उपाय आहे. व्हॅक्सिंग झाल्यानंतर तुम्ही त्वचेवर बर्फ फिरवून मसाज करु शकता. यामुळे पुरळ कमी होतो. याकरता एका कापडामध्ये बर्फ गुंडाळून तो बर्फ त्वचेवर फिरवा. यामुळे आराम मिळण्यास मदत होते.

Ice useful for beauty

ओला कापड

एखाद्या वेळेस तुम्हाला कसलीही allergy असल्यास एक सोपा वापर तुम्ही करु शकता. एक कॉटनचा कापड घ्या. तो ओला करा आणि आपल्या हाता-पायांवर ठेवा. यामुळे थंडावा मिळण्यास मदत होते आणि त्वचेचा लालसरपणा आणि पुरळ देखील कमी होतो.


हेही वाचा – घरच्या घरी तयार करा ‘फ्रूट कंडीशनर’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -