अभ्यास करणे, पुस्तके, कादंबरी वाचताना म्हणजे कित्येक जणांच्या डोक्यावरून पाणी जाणे अशी स्थिती असते. कित्येक मुलांना अभ्यास करताना अक्षरश: झोप येते. काही मुले तर डुलकीच घेताना दिसतात. पण, खेळताना किंवा इतर कोणतेही काम करताना असं होत नाही. तुमच्या मुलाच्या बाबतीतही असंच घडत का? अभ्यास करताना त्याला झोप येते? मग ही बातमी तुमच्यासाठी. काहींना यामागे आळसपणा हे कारण वाटते. पण, दरवेळी अभ्यास करताना दरवेळी झोप येण्याला आळसपणा कारणीभूत असेलच असे नाही. वाचन करताना झोप येण्याला अनेक कारणे असु शकतात. जाणून घेऊयात पुस्तक वाचताना झोप येण्याची काही सामान्ये कारणे आणि त्यावरील उपाय,
वाचताना झोप येण्याची मुख्य कारणे –
- अभ्यास ही मानसिकदृष्ट्या थकवणारी गोष्ट असते. जेव्हा आपण काहीही वाचतो तेव्हा आपला मेंदू सतत नवीन माहिती मिळवण्याचा आणि त्यावर विचार करण्याचा प्रयन्त करत असतो. यामुळे आपले शरीर थकते आणि आपल्याला झोप येते.
- रात्री पुरेशी झोप न मिळाल्यास दिवसा झोप येणे स्वाभाविक असते. काहींना रात्री जागून अभ्यास करण्याची सवय असते. तुमच्या अनियमित झोपेचे चक्र तुमच्या रोजच्या अर्थात नैसर्गिक झोपेचे चक्रात व्यत्यय आणते. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर थकल्यासारखे वाटतात.
- याशिवाय अभ्यासातील एखादा विषय तुमच्या नावडीचा असेल तर तुम्हाला वाचताना झोप येऊ शकते. कारण वाचल्या जाणाऱ्या विषयात तुम्हाला रस नसेल तर मेंदू लवकर थकतो आणि तुम्हाला झोप येते.
- चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे शरीराला आवश्यक पोषकतत्वे मिळत नाही. जेव्हा तुम्ही खूप तळलेले, साखरयुक्त, कॅफिनयुक्त पदार्थ खाता तेव्हा तुम्हाला थकवा जाणवतो.
- जर तुम्ही एकाच स्थितीत बराचवेळ बसून वाचन केले किंवा खोलीत एकटं बसून वाचन केल्यास शरीरासह मन लवकर थकून जाते, ज्यामुळे तुम्हाला झोप येते.
- तुम्हाला जर आरोग्याच्या काही तक्रारी असतील जसे की, अॅनिमिया, थॉयरॉइड अशा समस्यांनी सुद्धा वाचताना झोप येऊ शकते.
झोप न येण्यासाठी उपाय –
- दररोज 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
- फळे, भाज्या, दही, तृणधान्ये यांसारख्या आरोग्यदायी गोष्टी खायला हव्यात.
- व्यायाम करावा. व्यायाम केल्याने शरीर उत्साही आणि तुमचे मन शांत होते.
- वाचन करताना शांत आणि उजेड असणाऱ्या खोलीत करावे.
- अभ्यास करताना वेळोवेळी पाणी प्यावे.
- वाचनाची, अभ्यासासाठी योग्य वेळ निश्चित करावी.
- अधुनमधुन संगीत ऐकावे. संगीत ऐकल्याने मन शांत होते आणि लक्ष केंद्रीत करता येते.
हेही वाचा :