Friday, March 28, 2025
HomeमानिनीHealthAmla Benefits: रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी गुणकारी आहे आवळा

Amla Benefits: रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी गुणकारी आहे आवळा

Subscribe

निरोगी राहण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असणे आवश्यक असते. कारण जेव्हा रोगप्रतिकारकशक्ती मजबूत नसते तेव्हा तुम्ही वारंवार आजारी पडत नाही. अशावेळी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आहाराकडे लक्ष द्यावे असे सांगितले जाते. नैसर्गिक पद्धतीने रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आवळा खाणे फायद्याचे ठरेल. आवळ्यात व्हिटॅमिन सी, ऍटी-ऑक्सिडंट सारखे पोषकतत्वे आढळतात. जे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती तर वाढवतातच शिवाय एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. यासह वायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी आवळा उपयुक्त ठरतो. चला तर मग जाणून घेऊयात, रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आवळा कसा गुणकारी ठरतो.

व्हिटॅमिन सी –

आवळा व्हिटॅमिन सी समृद्ध आहे. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असते. व्हिटॅमिन सी पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन उत्तेजित करण्यास मदत करते. इतकेच नाही तर एक शक्तीशाली ॲटी-ऑक्सिडंट म्हणून देखील कार्य करते, ज्यामुळे पेशींना ऑक्सिडेटिव्ह ताण टाळण्यास मदत होते. एकदंरच, जेव्हा शरीरातील पेशी निरोगी असतील तेव्हा रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते, हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे आहारात आवळ्याचा समावेश अवश्य करावा.

विषारी पदार्थ –

आवळा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. वास्तविक, विषारी पदार्थ शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत करतात. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळा अवश्य खायला हवा.

स्ट्रेस –

आवळा स्ट्रेस देखील कमी करतो. खरं तर, जेव्हा शरीरात ताणतणावाची पातळी वाढते तेव्हा कोर्टिसोल नावाचा हार्मोन वाढतो. या हार्मोनमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. अशा परिस्थितीत तुम्हाला ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे.

दाहक-विरोधी गुणधर्म –

आवळ्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही आवळ्याचे सेवन करता तेव्हा शरीरातील जळजळ कमी होते. ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini