वाढत्या वयाबरोबर स्मरणशक्ती कमी होणे ही एक सामान्य समस्या झाली आहे. काहींना कमी वेळातच लहानसहान गोष्टी विसरण्याची समस्या जाणवते. आता तर परीक्षेचा काळ सुरू आहे. त्यामुळे केलेला अभ्यास वेळेत न आठवल्याने परीक्षागृहात मुलांचा तारांबळ उडते. अशावेळी मुलांनी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दररोज काही योगासनांचा सराव करायला हवा. चला तर मग जाणून घेऊयात, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मुलांनी कोणत्या योगासनांचा सराव करायला हवा.
वृक्षासन – वृक्षासनामुळे ध्यान केंद्रित करण्यास मदत होते. यासह स्नायू मजबूत होतात.
- वृक्षासन करण्यासाठी जमिनीवर सरळ स्थितीत उभे राहा.
- उजवा पाय उचलून गुडघ्यात वाकवा.
- त्या पायाचे पाऊल डाव्या मांडीच्या खाली आणि गुडघ्याच्यावर ठेवा.
- डावा पाय ताठ ठेवा आणि त्यावर शरीराचा तोल सांभाळा.
- शरीर स्थिर झाल्यावर दीर्घ श्वास घेत हळूहळू दोन्ही हात डोक्यावर न्यावेत.
- दोन्ही हातांनी नमस्काराची मुद्रा करावी. नमस्काराची मुद्रा करताना पाठीचा कणा ताठ ठेवावा.
पद्मासन – पद्मासन केल्याने पचन सुधारते. चिंता कमी होते आणि एकाग्रता सुधारण्यासाठी मदत मिळते.
- आसनावर बसा. उडवा पाय गुडघ्यापर्यत वाकवा.
- उजवा पाय तुमच्या हातांच्या मदतीने डाव्या मांडीवर ठेवावा.
- यानंतर डावा पाय गुडघ्यापर्यत दुमडावा.
- डावा पाय तुमच्या हातांनी धरा आणि तो तुमच्या उजव्या मांडीवर ठेवावा.
शवासन – शवासनाच्या सरावाने मनाला शांतता मिळते आणि लक्ष केंद्रीत करण्यासाठी मदत मिळते.
- पाठीवर झोपावे.
- हळूवारपणे डोळे बंद करावेत.
- डोळे बंद करून रिलक्स फिल करावे.
ताडासन – ताडासनाच्या सरावाने शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत होते.
- पायांची बोटे एकमेकांना स्पर्श करून उभे राहावे.
- टाचांमध्ये थोडे अंतर राखावे.
- दोन्ही हात आपल्या शरीराजवळ सरळ ठेवा.
- आता दीर्घ श्वास घेऊन तुमचे दोन्ही हात डोक्याच्या वर करा आणि हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंतवा.
- हात सरळ ठेवा आणि ताणून घ्या.
- आता दोन्ही पायांची टाच उचला आणि पायांच्या बोटांवर उभे राहा.
- 10 ते 12 सेकंद या स्थितीत उभे राहा आणि श्वास घेत राहा.
- हे आसन तुम्ही 10 वेळा करू शकता.
हेही पाहा –