घराघरातील किचनमध्ये दिसणारी वस्तू म्हणजे फ्रीज. भाज्या , उरलेले पदार्थ, कापलेली फळे दिर्घकाळ ताजे राहण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवण्यात येतात. पण, खरंच ती फ्रेश राहतात का? याचा कोणीही विचार करत नाही. तज्ञांच्या मते, काही खाद्य पदार्थांसाठी फ्रीजचं थंड तापमान घातक ठरू शकते. या पदार्थांच्या पोषणमूल्यांवर परिणाम होतो आणि आरोग्यासाठी असे पदार्थ हानिकारक ठरतात. काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नयेत, असे सांगितले जाते. चला तर मग जाणून घेऊयात, फ्रीजमध्ये कोणते पदार्थ ठेवू नयेत
- केळी फ्रीजमध्ये ठेवू नयेत. केळी फ्रीजमध्ये ठेवल्याने लवकर खराब होतात, त्यांची चव बदलते आणि काळी देखील पडतात.
- केळ्यांसह फळांमध्ये सफरचंद, बेरी, एवोकॅडो, जर्दाळू, आंबट फळे फ्रीजमध्ये ठेवू नयेत.
- लोणचे चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नये. लोणचे फ्रीजमध्ये ठेवल्याने लवकर खराब होते.
- बाजारात मिळणाऱ्या लोणच्यांमध्ये व्हिनेगर वापरण्यात येते. व्हिनेगरमुळे फ्रीजमधील इतर गोष्टी खराब होतात.
- टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचा रंग बदलतो आणि खराब होतो.
- ब्रेड फ्रीजमध्ये ठेवू नयेत. फ्रीजमध्ये ब्रेड ठेवल्याने ब्रेड सुकतो आणि त्याची चवही बदलते. याशिवाय ब्रेडमध्ये बॅक्टेरिया वाढतात, जे आरोग्यासाठी घातक असतात.
- बटाटा फ्रीजमध्ये ठेवल्याने बटाट्यातील स्टार्चचे रूपांतर साखरेत होते, जे आरोग्यासाठी योग्य नाही. त्यामुळे फ्रीजमध्ये बटाटे ठेवू नयेत.
- फ्रीजमध्ये कॉफी ठेवल्याने त्याचा ताजेपणा जातो. कॉफी कायम कोरड्या जागी ठेवावी.
- मधही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. लवकर खराब होतात.
- चुकूनही कांदा फ्रीजमध्ये ठेवू नये. यामुळे कांद्याचा वास इतर पदार्थांनाही येतो.
- कांद्याप्रमाणेच लसूणही फ्रीजमध्ये ठेवू नये.
- अनेक महिला मिरची, कोथिंबीरसोबत आले देखील फ्रीजमध्ये ठेवतात. पण, या सवयीमुळे आले खराब होऊ शकते.
हेही पाहा –