Wednesday, April 24, 2024
घरमानिनीमुलं उदास आहे, मग त्याला अस करा cheer up

मुलं उदास आहे, मग त्याला अस करा cheer up

Subscribe

जेव्हा मुलं उत्तम काम करतो तेव्हा त्याच्या आई-वडिलांनी त्याचे कौतुक करावे असे त्याला वाटत असते. परंतु आपल्याच पालकांनी आपले कौतुक केले नाही तर त्यांचा आत्मविश्वास हा हळूहळू कमी होऊ लागतो. जेव्हा मुलं उदास असते त्याला अशावेळी प्रोत्साहन देणे थोडं मुश्किल होऊ शकते. खासकरुन अशावेळी जेव्हा तुम्ही पर्याय वापरुन थकता. पण आम्ही तुम्हाला तुमचे मुलं उदास असेल तर त्याला चिअर अप कसे कराय याच बद्दलच्या काही खास टीप्स सांगणार आहोत.

-कौतुक करा

- Advertisement -


जेव्हा कधीही तुमचे मुलं उदास असेल किंवा रडत असेल तेव्हा त्याने केलेल्या चांगल्या गोष्टींचे कौतुक करा. जेव्हा तुम्ही मुलाला असे बोलाल तेव्हा त्याचे लक्ष त्या गोष्टींकडे जाईल. उदास असलेल्या मुलांना चिअर अप करण्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे.

-गाणं गा

- Advertisement -


मुलं एखाद्या गाणाचा आवाज ऐकून लगेच नाचायला सुरु करतात. अशाचच तुम्ही सुद्धा तुमचे मुलं उदास बसलेले असेल तेव्हा एखादे त्याच्या आवडीचे गाणं गाऊन दाखवा. तुमचे गाणं ऐकूण ते खुश होतील.

-मुलांचे ऐका


काही वेळेस मुलं दु:खी असतात तेव्हा तुम्ही त्यांचे ऐकून घेतले पाहिजे. त्यांना त्यामागील कारणं ही विचारा. तुम्ही त्याची काळजी करत असल्याचे पाहता तो तुम्हाला नक्कीच तुमच्या मनातील काही गोष्टी सांगेल.

-मोकळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जा


काही मुलांना मोकळ्या जागेत फिरायला घेऊन गेल्यानंतर ते खुश होतात. अशातच तुमचे मुलं सुद्धा उदास असेल तर त्याला मोकळ्या ठिकाणी फिरायला जरुर घेऊन जा.


हेही वाचा- Dental Care: मुलांना cavity पासून कसे दूर ठेवाल?

- Advertisment -

Manini