Tuesday, December 10, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीमहिलांनो अशा पद्धतीने निवडा तुमच्यासाठी बेस्ट Perfume

महिलांनो अशा पद्धतीने निवडा तुमच्यासाठी बेस्ट Perfume

Subscribe

आपण सुंदर दिसावे, रहावे यासाठी विविध गोष्टी करत असतो. अशातच तुम्ही कधी ऐकले आहे का, आपल्या शरिराला स्वच्छ ठेवण्यासह सुंगधी ठेवल्यास तुम्ही प्रसन्न राहता? हे खरं आहे. कारण जेव्हा आपण आपल्यासाठी उत्तम परफ्युम्स निवडतो तेव्हा त्याचा सुवास हा सर्वत्र दरवळला जातोच. पण तुमच्यासह तुमच्या आजूबाजूला असणाऱ्यांना सुद्धा प्रसन्न वाटते. अशातच काही महिलांना कळत नाही की, त्यांनी स्वत:साठी नक्की कोणता परफ्युम निवडला पाहिजे आणि तो कशा पद्धतीने लावावा. याच गोष्टीवरुन महिला अधिक कंफ्युज होतात. म्हणून आम्ही तुम्हाला बेस्ट परफ्युमची निवड कशी करावी आणि तो योग्य पद्धतीने कसा लावावा याच बद्दल अधिक सांगणार आहोत.

तुमचे व्यक्तिमत्व, त्वचा आणि ओकेजननुसार निवडा

- Advertisement -

-पर्सनालिटी
जर तुम्ही नेहमीच बाहेर राहत असाल तर तुम्ही फ्रुट अथवा फ्लोरलचा सुवास असलेला परफ्युम निवडावा. तर ज्या महिला बहुतांश वेळेस घरातच असतात त्यांनी कॉम्पलेक्स किंवा वूडी सेंट खरेदी करु शकता. तु्म्हाला तुमच्या पर्सनालिटी नुसार कोणता परफ्युम निवडावा या बद्दल गोंधळाल असाल तर अशातच तुम्ही तुमच्या मित्रांचा सल्ला घ्या.

-त्वचेनुसार
असे सांगितले जाते की, ज्चांची त्वचा तेलकट असते त्यांनी लाइटर कॉन्सनस्ट्रेशन आणि ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांनी रिचर कॉन्सनस्ट्रेशन असणारे परफ्युम निवडावेत.

- Advertisement -

-ओकेजनच्या हिशोबाने
जर तुम्ही सकाळच्या वेळेस कॅज्युअल आउटिंगसाठी जात असाल तर लाइट आणि रिफ्रेशिंग परफ्युम निवडला पाहिजे. तर पार्टी अथवा खास इवेंटमध्ये हार्ड फ्रेगरेंस असणारा परफ्युम लावू शकता. परंतु त्याची क्वालिटी उत्तम असली पाहिजे.

परफ्युम कसा लावाल?
परफ्युम लावताना या गोष्टीची काळजी घ्या की, त्याचा सुवास व्यवस्थितीत येईल. या व्यतिरिक्त तो अधिक लावू नका. कारण यामुळे दुसऱ्यांचे डोकं सुद्धा दुखू शकते. जेवढा कमी आणि लाइट स्मेल असलेला परफ्युम वापराल तेवढाच तो दीर्घकाळ टिकून राहिल. तसेच तुमची पर्सनालिटी उत्तम होईल.

नेहमीच परफ्युम स्टोर करताना तो रुम टेमरेंचर मध्ये ठेवावा. त्याचसोबत याचा संपर्क उन्हाशी येऊ देऊ नका. असे सांगितले जाते की, यामुळे याच्या सुवासासह क्वालिटीला सुद्धा नुकसान पोहचते.


हेही वाचा: Hair Oiling Tips : केसांना केव्हा आणि किती तेल लावावे जाणून घ्या

- Advertisment -

Manini