Saturday, November 23, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीElectric Kettle : इलेक्ट्रिक किटली कशी स्वच्छ करायची?

Electric Kettle : इलेक्ट्रिक किटली कशी स्वच्छ करायची?

Subscribe

इलेक्ट्रिक किटली हल्ली बऱ्याचजणांच्या किचनमध्ये दिसते. थंडीच्या दिवसात झटपट कॉफी बनवण्यासाठी इलेक्ट्रिक किटलीचा वापर केला जातो. या किटलीमध्ये चुटकीसरशी कॉफी,चहा बनवून तयार होते. केवळ चहा, कॉफीचं नाही तर यात हवे तेव्हा पाणी देखील गरम करता येते. पण, या इलेक्ट्रिक किटलीमुळे कामे झटपट होत असली तरी या इलेक्ट्रिक किटलीचा स्वच्छचा करणे कठीण काम असते. या किटलीच्या खालच्या भागात स्विच असल्याने ही इलेक्ट्रीक किटली पाण्याखाली धरून स्वच्छ करता येत नाही. मग, इलेक्ट्रिक किटली नक्की स्वच्छ तरी कशी करायची? पाहूयात, यासंर्दभातील काही सोप्या टिप्स,

व्हिनेगर –

इलेक्ट्रिक किटलीला स्वच्छ करण्यासाठी 2 टेबलस्पून व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण किटलीत भरावे. यानंतर किटलीचे स्वीच ऑन करावे. पाण्याला उकळी आल्यावर काही वेळाने हे पाणी ओतून द्यावे आणि किटली स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी.

- Advertisement -

लिंबू –

इलेक्ट्रिक किटलीत लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि लिंबाच्या सालींचे काही तुकडे टाकावेत. यानंतर 2 ते 3 ग्लास पाणी घालावे. थोड्या वेळाने हे पाणी फेकून द्या. लिंबामुळे किटलीतील चहा, कॉफीचे डाग आणि दुर्गंधी नाहीशी होते.

किटली स्वच्छ करताना या चुका टाळा –

  • किटली स्वच्छ करण्यासाठी तारेचा स्क्रब वापरू नयेत. यासाठी कायम मऊ स्क्रबरचा वापर करावा.
  • काहींना इलेक्ट्रिक किटली स्वच्छ करताना पाण्याखाली धरून धुवायची सवय असते. त्यामुळे किटली खराब होण्याची शक्यता असते. काहीवेळा तर शॉक लागण्याची शक्यताही असते. कारण पाणी चुकून जर स्वीचमध्ये राहीले तर अनर्थ घडू शकतो.
  • किटलीमध्ये कायमसाठी पाणी भरून ठेवू नका. यामुळे हिटिंग इलेक्ट्रिक स्विच खराब होऊ शकतो.
  • इलेक्ट्रिक किटली वेळोवेळी स्वच्छ न करणे. वेळोवेळी इलेक्ट्रिक किटलीची स्वच्छता राखल्याने ती दिर्घकाळ टिकते.

 

- Advertisement -

 

 

हेही पाहा –


Edited By  – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini