हिवाळ्यात फ्लॉवर जास्त प्रमाणात खाल्ला जातो. फ्लॉवरचा वापर आपण विविध पदार्थात करतो. फ्लॉवरमध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे शरीर निरोगी राहते. पण, फ्लॉवर स्वच्छ करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते, हे देखील तितकचं खरं आहे. फ्लॉवरमधील अळ्या पटकन निघत नाही. त्यामुळे फ्लॉवरसारख्या भाज्या धुणे कठीण असते. अनेकजण तर यातील अळ्या सहजतेने निघत नाहीत म्हणून फ्लॉवर खाणे बंद करतात. पण, अळ्यांच्या भितीने पौष्टीक फ्लॉवर खाणे सोडून देणे हा पर्याय नाही. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला फ्लॉवर स्वच्छ करण्यासाठी काही ट्रिक सांगणार आहोत. ज्याच्या साहाय्याने फ्लॉवरमधील अळ्या सहजतेने निघतील.
पहिली पद्धत –
- सर्वात आधी फ्लॉवरचे लहान लहान तुकडे करून घ्या.
- तुकडे करण्यासाठी धारदार सुरीचा वापर करावा. यामुळे फ्लॉवरचे बारीक तुकडे होतील.
- यानंतर फ्लॉवर वाहत्या पाण्याखाली धरावा.
- अशा तऱ्हेने तुम्ही फ्लॉवर मधील अळ्या काढू शकाल.
दुसरी पद्धत –
- एका भांड्यात पाणी घ्या आणि थोडे मीठ टाकून घ्या.
- तयार पाण्याला उकळी आली की, या पाण्यात फ्लॉवर टाका.
- या पद्धतीने बॅक्टेरिया, पेस्टिसाइड्स आणि अळया निघून जातील.
तिसरी पद्धत –
- एका भांड्यात पाणी गरम करण्यास ठेवा.
- पाणी गरम झाले या पाण्यात फ्लॉवर उलटा करून टाकावा. फ्लॉवरच्या पानांची बाजू वर राहील याची खात्री करावी.
- यानंतर पाण्यात मीठ आणि १ चमचा मैदा घालावा.
- चमच्याने पाणी ढवळत राहा. 15 ते 20 मिनिटानंतर पाण्यातून फ्लॉव बाहेर काढा आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
फ्लॉवरची खरेदी करताना या गोष्टी महत्त्वाच्या-
- फ्लॉवर विकत घेताना नीट बघून घ्यावा.
- काळपट फ्लॉवर चुकूनही खरेदी करू नये.
- फ्लॉवर जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवू नये.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे फ्लॉवर प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू नये.
- Advertisement -
- Advertisement -
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde