Thursday, March 27, 2025
HomeमानिनीKitchen Tips : कॉपरची भांडी अशी करा साफ

Kitchen Tips : कॉपरची भांडी अशी करा साफ

Subscribe

आजही बरेच लोक घरी तांब्याची भांडी वापरतात. पूर्वीच्या काळी प्रत्येकजण तांब्याची भांडी वापरत असे. लग्नातही मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जायचा. जर मुलीचे लग्न असेल तर हुंड्यात तांब्याची भांडी देण्याची प्रथा होती. आजही अनेक ठिकाणी तांब्याच्या भांड्यांचा वापर केला जातो. परंतु ही भांडी कालांतराने काळी होऊ लागतात. या भांडयांवर काळा थर जमा होऊ लागतो. त्यामुळे या कॉपरच्या भांड्यांची चमक देखील निघून जाते. आज आपण या लेखातून जाणून घेऊयात कॉपरची भांडी कशी साफ करायची.

कॉपरची भांडी बिअरने का स्वच्छ होतात?

बिअरने कॉपरची भांडी स्वच्छ होण्यामागचं कारण म्हणजे यामध्ये अॅसिडिक गुणधर्म असतात. बिअरमध्ये कर्बोदकायू अॅसिड्स असतात, जे तांब्यावरचे काळसर थर दूर करतात. बिअरमध्ये असलेले अल्कोहोल घाण आणि चिकटपणा दूर करण्यात मदत करतात.

तांब्याची भांडी बिअरने अशी करा स्वच्छ

साहित्य

  • उरलेली बिअर
  • स्वच्छ कापड किंवा मऊ स्पंज
  • कोमट पाणी
  • सुका कपडा

स्वच्छ करायची पद्धत

  • सर्वात आधी जे कॉपरच भांड स्वच्छ करायचं त्या भांडयावर उरलेली बिअर ओता.
  • जर भांडे मोठे असेल तर एका भांड्यात बिअर घ्या आणि त्यात कापड बुडवा आणि कपड्याच्या मदतीने भांड स्वच्छ पुसून घ्या.
  • मऊ स्पंज किंवा कापडाच्या मदतीने भांडे हळूवारपणे घासून घ्या.
  • बिअरमधील असलेले आम्ल काळे डाग दूर
  • जर भांडे खूप काळे झाले असेल तर ५-१० मिनिटे भांड्यावर राहू द्या.
  • आता भांडी स्वच्छ आणि कोरड्या कापडाने पूर्णपणे पुसून टाका जेणेकरून ते चमकदार दिसेल.

बिअर आणि मीठ

  • यासाठी सर्वात आधी भांड्यामध्ये बिअर घाला.
  • नंतर त्यात मीठ घाला, मीठ कमी घाला.
  • आता स्पंज किंवा कापडाने हलक्या हाताने घासून घ्या
  • काही वेळ तसेच राहू द्या आणि भांडे गरम पाण्याने धुवून स्वच्छ करा.

हेही वाचा : Kitchen Tips : वर्किंग मॉम्ससाठी बेस्ट कूकिंग टिप्स


Edited By : Prachi Manjrekar

Manini