आपण घर नेहमीच स्वच्छ ठेवू पाहतो. मात्र काही वेळेस असे होते की, असे प्रत्येकवेळी होत नाही. घर धुळीमुळे अस्वच्छ होते. अशातच घरी अचानक पाहुणे आल्यानंतर अस्वच्छ घरात त्यांना विचित्र वाटते. घरी जेव्हा एखादे पाहुणे येतात तेव्हा तुमच्या अस्वच्छ घराला पाहून काही ना काही विचार जरुर करतात.
अशातच पाहुण्यांसमोर आपले इंप्रेशन वाईट पडू नये म्हणून आपण झटपट घर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. खरंतर घर स्वच्छ करण्यासाठी किती वेळ लागतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे अचानक पाहुणे आल्यानंतर झटपट घर कसे स्वच्छ करावे याच बद्दलच्या काही खास टीप्स आपण पाहणार आहोत.
मोठ्या बास्केटची मदत घ्या
जेव्हा घरी पाहुणे येतात तेव्हा आपल्याकडे ऐवढा वेळ नसतो की, प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी ठेवू. अशातच बेस्ट ऑप्शन असा की, एक मोठे बास्केट घ्या. यामध्ये तुम्ही अतिरिक्त स्टफ किंवा क्लटर सामान ठेवू शकता.
असे करण्यासाठी तुम्हाला फारसा वेळ लागणार नाही. मात्र घर लगेच स्वच्छ होण्यास मदत होईल. जेव्हा तुम्ही बास्केटमध्ये सामान ठेवता तेव्हा या गोष्टीची काळजी घ्या की ते सामान पाहुण्यांना लागणार नाही.
प्रत्येक खोली स्वच्छ करत बसू नका
जेव्हा संपूर्ण घराची स्वच्छता करायची असते तेव्हा खुप वेळ खर्च होतो. मात्र घरी पाहुणे आले तर खुप वेळ नसतो. अशातच उत्तम पर्याय म्हणजे आपल्या घराची एंन्ट्री ते लिविंग एरिया स्वच्छ करा. जर पाहुणे थोडावेळासाठीच थांबणार असतील तर त्या ठिकाणी अधिक स्वच्छता द्या जेथे त्यांचे लगेच लक्ष जाईल किंवा तेथे ते बसणार असतील.
रुम स्प्रे करा
जेव्हा रुम क्लिनिंगची वेळ येते तेव्हा लहान-लहान गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते. मात्र जेव्हा पाहुणे घरी येणार असतील तेव्हा ऐवढा वेळ नसतो. घराची पूर्णपणे स्वच्छता करता येईल. अशातच रुम स्प्रे चा वापर करू शकता. अन्यथा तुम्ही वाइप्स मध्ये स्प्रे करून लिविंग एरिया वाइप करू शकता.
बाथरुम क्लिन करा
पाहुणे आल्यानंतर आपण घर घाईघाईत स्वच्छ करू लागतो. अशातच बाथरुम स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष करू नका. असे असू शकते की, घरी आलेल्या पाहुण्यांना बाथरुमची गरज भासू शकते. अशातच बाथरुम क्लिन करू शकता.
हेही वाचा- आपले घर नीट नेटके ठेवल्याने होतात ‘हे’ फायदे