हल्ली कोणाच्या घरात फ्रीज नसेल असे घर सापडणे थोडं मुश्किल आहे. फ्रीजमुळे महिलांची अनेक कामे सोप्पी झाली आहेत. दैंनदिन जीवनात बऱ्याच गोष्टींसाठी फ्रीजचा वापर केला जातो. फ्रीजमध्ये अन्नपदार्थ, भाज्या, फळे ठेवल्याने दीर्घकाळ टिकतात. पण, कधी कधी आणलेली कोणतीही गोष्ट दीर्घकाळ टिकवण्यासाठी सरळ फ्रीजमध्ये ठेवली जाते. ज्यामुळे फ्रीज एक प्रकारचे कपाट होते आणि अस्वच्छ देखील बनते. या सततच्या सवयीमुळे अस्वच्छ फ्रीज लवकरच विषाणूंचा अड्डा बनतो आणि विविध आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे फ्रीजची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे. जर वेळोवेळी तुम्ही फ्रीज स्वच्छ केला नाही तर अस्वच्छतेमुळे अनेक इन्फेक्शन तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळे दर काही महिन्यांनी फ्रीज स्वच्छ करणे आवश्यक आहे. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात, फ्रीज स्वच्छ कसा करायचा
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे फ्रीज स्वच्छ करताना स्विच बंद करावा. तुम्ही जेव्हा स्विच बंद करता तेव्हा कोणत्याही प्रकारची दुर्घटना होण्याची शक्यता नसते.
- फ्रीजचा स्विच बंद केल्यावर सर्व भाज्या आणि फळे बाहेर काढावेत.
- फ्रीजखाली जाड कापड तुम्ही अंथरू शकता, जेणेकरून त्यातील घाण कपड्यावर पडेल आणि फरशी खराब होणार नाही.
- फ्रीज पुसण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा.
- फ्रीज जेव्हा तुम्ही पाण्याने पुसाल तेव्हा किमान तासभर उघडा ठेवावा.
- पाण्याने पुसण्याऐवजी तुम्ही व्हिनेगरचा वापर करू शकता. फ्रीज व्हिनेगरच्या पाण्याने स्वच्छ केल्यास फ्रीजमधील दुर्गंधी दूर होईल.
- व्हिनेगरच्या पाण्याऐवजी कोमट पाण्यात मीठ टाकून त्या पाण्याने फ्रीज स्वच्छ करावा. यासाठी तुम्हाला कापड लागेल. आता तयार मिश्रणात कापड ओला करून फ्रीज आतून स्वच्छ करता येईल.
- यानंतर फ्रीजमधील ट्रे बाहेर काढा आणि ते स्वच्छ करून घ्यावेत.
- फ्रीज अस्वच्छ होऊ नये असे वाटत असल्यास त्यात कोणतेही पदार्थ उघडे ठेवू नयेत. कापलेली फळे, भाज्या, कांदा डब्यात पॅक करून ठेवाव्यात.
- यासह दररोज फ्रीज ओल्या कपड्याने स्वच्छ करावा किंवा तुम्ही पाण्याचा स्प्रे मारून कोरड्या कपड्याने फ्रीज स्वच्छ करू शकता.
हेही पाहा –