इस्त्री हि प्रत्येकाच्या घरात असते. इस्त्रीचा वापर सगळेजण जास्त करतात. इस्त्री जुनी झाली असेल किंवा खूप वेळा वापरून ती खराब झाली असेल तर ती इस्त्री चांगल्या कपड्यावर वापरून काही फायदा होणार नाही. यामुळे कपडे तर खराब होतीलच. याशिवाय इस्त्रीचे जंगचे डाग नवीन कपड्यावर उठून दिसतील. यामुळे ते कपडे वाया जाऊ शकतात.
बऱ्याचदा असंही होतं की घरी नायलॉन, पॉलिस्टर अशा कपड्यांना इस्त्री करत असताना कपडा जळतो आणि त्याचा चॉकलेटी, तपकिरी रंगाचा डाग इस्त्रीवर तसाच राहतो. या डागामुळे मग इतर कपडेही खराब होण्याचा धोका असतो. म्हणूनच कपडा जळाल्याचे डाग किंवा मग इस्त्रीला चढलेला गंज, असे दोन्हीही डाग काढायचे असतील, तर हे काही घरगुती उपा करून बघा.
इस्त्रीला पडलेले डाग काढण्यासाठी ‘हे’ करा उपाय…
- पॅरासेटीमॉल गोळ्या वापरा-
घरात जर पॅरासेटीमॉलच्या एक्स्पायरी डेट झालेल्या गोळ्या असतील तर त्याचा उपयोग इस्त्री स्वच्छ करण्यासाठी करू शकता. हा उपाय करण्यासाठी इस्त्री सुरू करून थोडी कोमट करून घ्या. त्यानंतर ती बंद करा. आता कोमट इस्त्रीवर पॅरासेटीमॉलची गोळी घासा. थोडंसं घासल्यावर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या.
- बेकींग सोडा आणि लिंबूचा करा वापर-
एकी टेबलस्पून बेकींग सोडा एका वाटीत घ्या. त्यात ४ ते ५ थेंब लिंबाचा रस टाका. थोडं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट इस्त्रीवर पडलेल्या डागावर लावा. एखादा मिनिट तशीच राहू द्या. यानंतर इस्त्रीवर हे घासून घ्या आणि मग हे डाग स्वच्छ होतील. यानंतर इस्त्री स्वच्छ पाण्याने चांगली पुसून घ्या.
- सॅण्डपेपरचा वापर करा-
सॅण्ड पेपरचा वापर करून इस्त्रीवरचे गंजाचे किंवा जळालेले डाग पटकन काढता येतात. हा उपाय करण्यासाठी इस्त्रीवर थोडं पाणी शिंपडून तो डाग ओलसर करून घ्या. आता या ओलसर डागावर सॅण्डपेपर घासा. तसेच सॅण्डपेपर हळूवारपणे घासा. असे दोनदा तरी करा जेणेकरून हा डाग स्वच्छ होईल.
- चुना आणि मिठाचा वापर करा-
चुना आणि मीठ समप्रमाणात एकत्र घ्या. ते व्यवस्थित कालवून इस्त्रीवर जिथे डाग पडले आहेत, अशा ठिकाणी लावा. १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर इस्त्रीवर पाणी शिंपडून हा भाग थोडा ओला करून घ्या आणि कपड्याने डाग घासून स्वच्छ करा. जर हा डाग कठीण असेल तर हा उपाय २ ते ३ वेळा करा.
हेही वाचा :