कित्येक जणांची सकाळ चहा प्यायल्याशिवाय पूर्ण होत नाही. चहा प्यायल्यावर फ्रेश वाटते. पण, चहा प्यायल्यानंतर चहाची गाळण स्वच्छ करणेही महत्वाचे असते नाहीतर गाळणीवर चहाचे डाग जमा होतात. असे काळेकुट्ट डाग वाढत गेल्यावर गाळणी स्वच्छ करणे कठीण होते. त्यामुळे वेळोवेळी चहाची गाळणी आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला चहाची अस्वच्छ गाळणी चुटकीसरशी कशी स्वच्छ करायची यासंर्दभात काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत.
अशी करा स्वच्छ –
सर्वात महत्वाचे म्हणजे नियमित गाळणी स्वच्छ करावी. असे केल्याने गाळणीवर डाग जमा होत नाहीत. गाळणी दररोज कोमट किंवा बर्फाच्या पाण्याने धुवावी. तुम्ही जर चहाची गाळणी तासनतास तशीच ठेवल्यास त्यावर डाग जमा होत जातात आणि अशी गाळणी साफ करणे कठिण होते.
चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी तांदूळ वापरावेत. तांदळाच्या दाण्यांमुळे गाळणीतील चहापावडर सहजपणे निघते. यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यास ठेवा आणि गाळणीत तांदळाचे दाणे टाका. दाणे टाकल्यावर गाळणीची जाळी हाताने स्वच्छ करा. आता गाळणी पाण्यात बुडवा. या ट्रिकने चहाची गाळणी स्वच्छ होईल.
चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा वापरणे फायद्याचे ठरेल. यासाठी कोमट पाण्यात चिमूटभर बेकिंग सोडा मिक्स करुन त्याचे द्रावण तयार करुन घ्यावे. तयार द्रावणात गाळणी काही तास बुडवून ठेवावी. यांतर हलक्या हाताने स्वच्छ करावी. चहाचे डाग स्वच्छ होतील.
चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोलचा वापर करता येईल. यासाठी चमचाभर अल्कोहोल पाण्यात टाका. तयार पाण्यात रात्रभर चहाची गाळणी बुडवून ठेवा. सकाळी स्वच्छ पाण्याने गाळणी धुवावी. या ट्रिकने चहाच्या गाळणीवरील सर्व डाग स्वच्छ होतील.
मीठ आणि ऑलिव्ह ऑइलने चहाच्या गाळणीवरील डाग स्वच्छ करता येतील. यासाठी भांड्यात 1 चमचा मीठ आणि 1 चमचा ऑलिव्ह ऑइलची पेस्ट तयार करून घ्यावी. तयार पेस्ट मऊ कापडावर घेऊन त्याने जाळी स्वच्छ करावी. सर्वात शेवटी स्वच्छ पाण्याने गाळणी धुवून घ्यावी.
काळीकुट्ट झालेली चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात कॉर्नस्टार्चची पेस्ट बनवून घ्यावी. तयार पेस्ट हलक्या हातांनी गाळणीच्या जाळीवर घासावी. या ट्रिकने काळे डाग स्वच्छ होतील.
हेही पाहा –