घरलाईफस्टाईलकुठले अन्न कसे शिजवायचे?

कुठले अन्न कसे शिजवायचे?

Subscribe

* २५० ग्रॅम हिरव्या भाज्यांना पाणी न टाकता झाकण ठेवून २ ते ३ मिनिटं मायक्रो करावे. भाज्यांचे प्रमाण दुप्पट असेल तर वेळ दुप्पट करण्याऐवजी दिलेल्या वेळेत १ मिनिट जोडून द्यावे.

*४ बटाट्यांना एका पॉलिथिनमध्ये ठेवून त्यात दोन-तीन छिद्रे करून १ चमचा पाणी घालून ५ मिनिटं मायक्रो करावे. बटाटे, गाजर, रताळी, बीन्स सारख्या भाज्यांना नेहमी स्टॅडिंग वेळ द्यावा अर्थात दिलेल्या वेळेच्या आधी ओव्हन उघडू नये.

- Advertisement -

*दोन वाट्या कुरमुरे, पोहे यांना १ ते २ मिनिट, शेंगदाणे, काजू, बदाम इत्यादींना अर्धा चमचा तेल आणि मीठ भुरभुरून ३ ते ४ मिनिट मायक्रो करायला पाहिजे.

*ग्रेवी (मसालेदार रस्सा) तयार करण्यासाठी १ चमचा तेल घालून कांदे, टोमॅटो, आले, लसूण यांची पेस्ट तयार करून २ मिनिटे मायक्रो करावे. नंतर त्यात टोमॅटो प्युरी आणि इतर साहित्य घालून ३ ते ४ मिनिटे मायक्रो करावे.

- Advertisement -

* मेथी, पुदिना, कोथिंबीरसारख्या हिरव्या भाज्यांना वर्षभर टवटवीत ठेवण्यासाठी १ किलो मेथीला टर्न टेबलवर पसरावे. ५ मिनिटांपर्यंत मायक्रो करावे. ओव्हनला उघडून परत चालवावे. याप्रमाणे ५-५ मिनिटे वेळ देऊन मायक्रो करून त्यातील पाणी पूर्णपणे वाळवण्यासाठी १२-१५ मिनिटे मायक्रो करावे.

* भात, पुलाव आणि बिर्याणी बनवण्यासाठी १ कप तांदळाला १ तास पाण्यात भिजवून ठेवावे. नंतर बाऊलमध्ये २ कप पाणी, मीठ, १ चमचा तूप आणि वेगवेगळ्या भाज्या आणि मसाले घालून ७ मिनिट मायक्रो हाय्येस्ट, ३ मिनिट मीडियम आणि २ मिनिटे झाकण ठेवून मायक्रो करावे.

* शेंगदाणे, कुरमुरे आणि मेवा चिकी बनवण्यासाठी १ वाटी गुळाला १ चमचा तुपासोबत ४ मिनिटे मायक्रो सेकंड हाय तापमानावर ठेवावे. नंतर सव्वा वाटी इच्छित वस्तू घालून मिश्रणाला एकजीव करून चिक्या पाडाव्यात.

*(दाल) बाटी, केक, बिस्किट, माफीस, हांडवा इत्यादी कन्वेक्शन मोडमध्ये ओव्हनला १० मिनिटे प्री-हीट करून २० मिनिटांपर्यंत २२० डिग्री तापमानावर लो स्टॅडवर ठेवून शिजवावे.

* ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी चार ब्रेडचे पीस घेऊन हाई रँकवर २५० डिग्री सेंटीग्रेडवर ४ ते ५ मिनिटे एकीकडे आणि ३ ते ४ मिनिटे दुसरीकडून शेकावे.

* पनीर टिक्का, बेक व्हेजसारख्या भाज्यांना ग्रिल किंवा कन्वेक्शनवर १० ते १५ मिनिटांपर्यंत बेक करावे.

*पिझ्झा, बेक समोसा, खारी इत्यादींना १० मिनिटांपर्यंत प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये १५ मिनिटांपर्यंत बेक करावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -