Sunday, February 16, 2025
HomeमानिनीHiccups Remedies : उचकीने हैराण झालात? हे करा उपाय

Hiccups Remedies : उचकीने हैराण झालात? हे करा उपाय

Subscribe

उचकी लागल्यावर कोणीतरी मनापासून आठवण काढत आहे, असे म्हटले जाते. एकदा उचकी लागल्यावर थांबायचे नाव घेत नाही. अशावेळी पाणी प्यायचे सल्ला दिला जातो. लागलेली उचकी थांबवण्यासाठी ना – ना तऱ्हेचे उपाय केले जातात. पण, उचकी थांबायचे नाव घेत नाही. अशावेळी नक्की काय करावे, असा प्रश्न पडतो. तुमच्याही बाबतीत असंच होत का? चला तर मग या लेखामधून जाणून घेऊयात उचकी थांबविण्यासाठी सोपे उपाय

  • उचकी लागल्यावर पाणी प्यावे. पण, एकदाच पिऊ नये. तुम्ही घोट घोट पाणी प्यायला हवे. असे केल्याने उचकी थांबेल.
  • उचकी थांबायचे नाव घेत नसेल तर श्वास रोखून धरावा. यासाठी हाताने नाक आणि तोंड काही सेंकदासाठी बंद करा. या उपायाने उचकी थांबते. पण, ज्या व्यक्तींना श्वासासंबंधी समस्या असतील त्यांनी हा उपाय करू नये.
  • उचकी लागल्यावर जीभ बाहेर काढावी. हा उपाय खूप प्रभावी उपाय मानला जातो.
  • उचकी लागल्यावर एक चमचा लिंबाचा रस आणि मध याचे चाटण तयार करुन करुन घ्या. उचकी लागल्यावर हे चाटण खा. या उपायाने उचकी थांबेल.
  • उचकी थांबवण्यासाठी वेलची आणि लवंगाचे पाणी फायद्याचे ठरेल. हे पाणी तयार करण्यासाठी 2 वेलची, 2 लवंगा पाण्यात उकळवून घ्याव्यात. तयार पाणी गाळून प्यावे.
  • मध खाल्ल्याने उचकी थांबण्यासाठी मदत होते.
  • उचकी थांबवण्यासाठी 1 ग्लास कोमट पाणी, पुदिन्याची पाणी, लिंबाचा रस, चिमूटभर मीठ मिक्स करुन घ्यावे. हे पाणी प्यायल्याने उचकी थांबेल.

डॉक्टरकडे कधी जावे –

जर सतत 2 ते 3 दिवस उचकी थांबायचे नाव घेत नसेल तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

 

 

 

हेही पाहा –

Manini