घरलाईफस्टाईलकोरोना आणि पावसाळ्यातील डेंग्यू , मलेरियाच्या लक्षणांमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या

कोरोना आणि पावसाळ्यातील डेंग्यू , मलेरियाच्या लक्षणांमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या

Subscribe

देशभरात गेल्या दीड पावणेदोन वर्षापासून पसलेल्या करोना व्हायरस झालेल्या रुग्णांना देखील डेंग्यू,मलेरिया प्रमाणे समान लक्षणे आढळून येतात.

पावसाळा सुरु होताच सगळीकडे साथीच्या आजारांचा संसर्ग वाढण्यास सुरुवात होते. कारण यावेळी वातावरणात मोठ्याप्रमाणात बदल होत असतात. या बदलांशी आपल्या शरीराला जुळवून घ्यावे लागते. जेव्हा शरीर या बदलांना प्रतिकूल प्रतिसाद देते तेव्हा ताप, सर्दी, खोकला यांसारख्या सामान्य आजारांचा सामना करावा लागतो. याशिवाय पावसाळ्यात जंतू आणि विषाणूपासून होणाऱ्या आजारांचा धोकाही वाढतो. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या तापाच्या साथीमुळे दरवर्षी भारतात हजारो लोकांचा मृत्यू होतो. मात्र देशभरात गेल्या दीड पावणेदोन वर्षापासून कोरोना व्हायरस झालेल्या रुग्णांना देखील डेंग्यू,मलेरिया प्रमाणे समान लक्षणे आढळून येतात. यामुळे अनेकदा रुग्णांमध्ये गोधंळ उडाल्या सारखे होते की आपल्याला नेमकं कशामुळे हा त्रास होतोय. अशावेळी आपल्याला कोरोना व्हायरस आणि डेंग्यू ,मेलरिया सारख्या आजारादरम्यान दिसणाऱ्या लक्षणामध्ये नेमका काय फरक आढळून येतो हे आपण जाणून घेऊया.(how to differentiate between coronavirus symptoms dengue and malaria)

कोव्हिड 19 मुळे श्वसनाचे आजार उद्भवतात. तसेच हा व्हायरस कोरोना झालेल्या रुग्णांशी थेट संपर्कातून पसरतो. डेंग्यू आणि मलेरिया  हे आजार हवामानात बदल झाल्याने होऊ शकतात. या आजारांना व्हायरल इंफेक्शन असे म्हटले जात असून जे एडीस एजिप्टी नामक डासांमुळे पसरतात. हे डास घरगुती वातावरणात आणि आजूबाजूच्या परिसरात साचलेल्या पाण्यात अधिक वाढतात.

- Advertisement -
  • कोरोना,डेंग्यू आणि मलेरियाची लक्षणे 

कोव्हिड-

कोव्हिड 19 मध्ये ताप,ठंडी, खोकला. सर्दी, गळ्यामध्ये खवखव, श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखी, मांसपेशीमध्ये त्रास, थकवा , कमकुवतपणा सारखी लक्षणे दिसतात. हे सर्व वेगवेगळ्या प्रकारे डेंग्यू आणि मलेरियासोबत सुद्धा दिसू लागतात.

- Advertisement -

 डेंग्यू-

डेंग्यूच्या लक्षणांमध्ये अत्यंत उच्च ताप, तीव्र डोकेदुखी, सांधे आणि स्नायू दुखणे यांचा समावेश होतो आणि जठरोगविषयक लक्षणे जसे मळमळ, पोटदुखी आणि अतिसार यांचा समावेश असू शकतो.चार डेंग्यू व्हायरस सेरोटाइप आहेत, याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीला व्हायरसची लागण चार वेळा होऊ शकते. जसजसा हा रोग वाढत जातो तसतसे रुग्णांना धाप लागणे, नाक आणि हिरड्यांमधून रक्तस्त्राव आणि रक्तदाब झपाट्याने कमी होण्यामुळे धक्का बसू शकतो.

मलेरिया-

मलेरियामध्ये ताप,डोकेदुखी,ठंडी वाजणे यासरखी समान लक्षणे व्यक्तीला जाणवतात. जर 24 तासांच्या आत उपचार केले गेले नाही तर यामुळे गंभीर आजार होऊ शकतो. मलेरियाग्रस्त मुलांना एनीमिया,रेस्पिरेटरी डिस्ट्रेट किंवा तणाव,मस्तिष्क संबंधीत मलेरिया होण्याची शक्यता आहे.


हे हि वाचा – तिखट, चमचमीत आणि मसालेदार जेवण म्हणजे आजारांना आमंत्रण

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -