घरताज्या घडामोडीयंदाच्या भाऊबीजेसाठी कशी कराल बजेट शॉपिंग

यंदाच्या भाऊबीजेसाठी कशी कराल बजेट शॉपिंग

Subscribe

दिवाळी म्हटले की एक वेगळाच उत्साह असतो. फटाके, पणत्या, रांगोळी, आकर्षक कंदील आणि महत्त्वाचे म्हणजे फराळ या सगळ्यांची रेलचेल असते. प्रत्येक जण आपली दिवाळी कशी वेगळी असेल, कशी खास ठरेल याकडे लक्ष देत असतो. दिवाळीत एक अतूट नात्याचा सण असतो, तो म्हणजे ‘भाऊबीज’. शास्त्रानुसार भाऊबीजच्या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वतःच्या पत्नीच्या हाताचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जाऊन तिला वस्त्रालंकार देऊन तिच्या घरी जेवायची पद्धत असते. असे देखील म्हटले जाते की, भाऊबीजच्या दिवशी फक्त बहीण भावासाठी भेटवस्तू देते. सध्याच्या काळात दोघे देखील भाऊबीजच्या दिवशी भेटवस्तू देतात. यंदाच्या भाऊबीजेला बजेट शॉपिंगसाठी आम्ही सुचवत आहोत काही खास गिफ्ट्स.

यंदा प्रत्येक सणावर कोरोनाचं सावट आलं आहे. तरीदेखील व्हर्च्युअल पद्धतीने सण त्याच जोमात साजरे केले जात आहे. पण तुम्ही यंदा नेहमीच्या उत्साहात भाऊबीज साजरी करू शकता. कारण यंदा ई-कॉमर्स सारख्या वेबसाईटवर धमाकेदार ऑफर सुरू आहेत. त्यामुळे तुम्ही यंदा बहिणीसाठी आणि भावासाठी जबरदस्त भेटवस्तू घेऊ शकता. पण नेमकी कोणती भेटवस्तू घ्यायची हाच सगळ्यांचा प्रश्न पडत असतो. पण आज तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आम्ही देत आहोत. नेहमीप्रमाणे यावर्षी आम्ही तुम्हाला बहीण आणि भावासाठी हटके आणि खास गिफ्टच्या कल्पना सुचवणार आहोत.

- Advertisement -

फिटनेस रिलेटेड वस्तू

कोरोनाचा काळात अनेक जण आपल्या फिटनेसबाबत खूप जागृत झाले आहेत. वर्क फ्रॉम होममुळे घरी असलेल्यांना फिटनेसच्या निमित्ताने व्यायाम करणे, योगा करणे, सायकलिंग करणे हा प्रकार सध्या वाढलेला दिसत आहे. त्यामुळे या भाऊबीजला योगा मॅट, फिटनेस बँड, सायकल अशा प्रकारच्या तुम्ही फिटनेस रिलेटेड भेटवस्तू देऊ शकता. योगा मॅटची किंमत २५० पासून ते १००० पर्यंत आहे. फिटनेस बँडची किंमत ५०० ते १००० पासून सुरू होते. जर सायकल घेण्याचा विचार असेल तर तुम्हाला ३००० हून अधिक पैसे मोजावे लागतील.

- Advertisement -

पॉवर बँक

सध्याच्या काळात मोबाईल हा प्रत्येकासाठी अविभाज्य घटक झाला आहे. त्यामुळे तो मोबाईल सतत चालू ठेवण्यासाठी चार्जिंग असणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही या भाऊबीजला भावाला खास भेटवस्तू म्हणून पावर बँक देऊ शकता. जर तुम्हाला ब्रँडेड पॉवर बँक घ्यायची असेल तर तुम्हाला ती ५०० रुपयांपासून मिळू शकते.

मास्क

कोरोना असल्यामुळे मोबाईलप्रमाणे मास्क घालणे देखील आता अविभाज्य घटक झाले आहेत. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क आले आहेत. तसेच सणावार दिवशी घातल्या जाणार्‍या कपड्याप्रमाणे मॅचिंग मास्क -देखील मिळत आहेत. त्यामुळे तुम्ही भाऊबीज दिवशी मास्क देखील भेटवस्तू म्हणून देऊ शकता. मास्कची किंमत १० रुपयांपासून ते ४०० रुपये इतकीही आहे. जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा मास्क घ्यायचा असेल तर तुम्हाला जास्त पैसे देखील मोजावे लागतील.

पुस्तक

काही लोकांना पुस्तक ऐकायला आवडते तर काही लोकांना वाचायला. त्यामुळे तुम्ही या भाऊबीज भेटवस्तू म्हणून पुस्तक देऊ शकता. तसेच ज्यांना पुस्तक ऐकण्याची आवड आहे, अशा भाऊ किंवा बहीणी तुम्ही ऑडिओ बुकचं सबस्क्रिप्शन देऊ शकता. उदा. स्टोरी टेल, दिवाळी अंक इत्यादी प्रकारचे वाचनीय पुस्तक तुम्ही देऊ शकता.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चॅनेलचे सबस्क्रिप्शन

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट आणि वेबसीरिज पाहण्याची सध्या जास्त क्रेज वाढली आहे. त्यामुळे काहींना वेबसीरिज पाहण्याचे खूप वेड आहे. त्यामुळे ही भाऊबीज खास करण्यासाठी तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चॅनेलचे सबस्क्रिप्शन भेटवस्तू म्हणून देऊ शकता. सबस्क्रिप्शनची किमती एक महिना, तीन महिने आणि वर्षभराप्रमाणे असते. या सबस्क्रिप्शनची किंमत १९९ पासून सुरू होते.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -