सणासुदीला ट्रेडिशनल लूक करणे पसंद केले जाते. यासाठी महिला ट्रेडिशनल साड्या नेसणे पसंद करतात. अशातच तुम्ही कधी कांजीवरम साडी नेसण्याचा विचार करत असाल तर पुढील काही गोष्टी जरुर लक्षात ठेवल्या पाहिजेत.
योग्य पेटीकोटचा वापर
कांजीवरम साडी वजनाने थोडी जड असते. अशातच तुम्ही हेवी पेटीकोट घातला तर तुमची कंबर आणि हिप्स एरिया सुद्धा हैवी दिसेल. यासाठी कांजीवरम साडीसाठी पेटीकोट खरेदी करताना कमी घेर आणि हलक्या कापडाचा वापरावा.
अशा प्रकारे करा सुरू
सर्वात प्रथम तुम्ही पल्लूच्या प्लेट्स काढा आणि त्या पिनाने पिनअप करा. अशा प्रकारचे तुम्ही साडीचा अन्य भाग व्यवस्थितीत मॅनेज करू शकता. यासाठी 3-4 मोठे सेफ्टी पिनचा वापर करा. ब्लाउज आणि पेटोकोट घातल्यानंतर खांद्यावर पल्लूला सर्वात प्रथम पिन लावून साडी नेसण्यास सुरुवात करा.
प्लेट्स इस्री करा
साडी नेसण्यापूर्वी प्लेट्स तयार करा आणि त्या पिनाने व्यवस्थितीत पिनअप करा. त्यानंतर एखाद्या टेबलवर ठेवून त्या इस्री करा. जेणेकरुन त्या फुलल्या जाणार नाहीत.
फुटवेअर घालून करा ड्रिपिंग
जर तुम्ही हाय हिल्स सोबत कांजीवरम साडी नेसणार असाल तर साडी नेसताना हिल्स पायात घाला. अशाप्रकारे साडीची उंची परफेक्ट राहिल.
हेही वाचा- स्किन टोन नुसार निवडा साडीचा रंग