सुका मेवा आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम आणि लोह सारखे काही पोषक तत्वे असतात. त्यापैकीच एक म्हणजे आक्रोड. आरोग्याबद्दल बोलायचे झाल्यास तर आक्रोड खाल्ल्याने शरिराला प्रोटीन, फायबर, गुड फॅट्स, लोह, पोटॅशिअम आणि सोडियम मिळते. त्याचसोबत आक्रोड शरिराला व्हिटॅमिन सुद्धा देतात. अशातच प्रश्न असा उपस्थितीत राहतो की, ते नक्की कसे खावेत? आक्रोड भिजवून की न भिजवता खावेत असा प्रश्न सर्वांनाच पडतो. याच बद्दल अधिक जाणून घेऊयात.
आक्रोडमध्ये सुद्धा अन्य सुक्या मेव्याप्रमाणे नैसर्गिक कंपाउंड्स असतात. ज्यांच्या एंजाइम अॅक्टिव्हिटीच्या कारणास्तव पचनासह समस्या येते. त्यामुळे आक्रोड भिजवल्यास त्यामधील कमाउंड्स कमी होऊ लागतात. ते पचण्यास अधिक सोप्पे होते. त्याचसोबतत ते मऊ होतात आणि त्यांना चावून खाणे सोपे होते.
त्याचसोबत पोट अधिक संवेदनशील असेल किंवा काही अधिक खाल्ल्याने दुखण्यास सुरुवात झाल्यास तुम्ही आक्रोड भिजवून खाऊ शकता. भिजवलेल्या आक्रोडमधून तुमच्या शरिराला ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स , अँन्टी ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन आणि खनिजे मिळतात. याचे सेवन केल्याने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि इंफ्लेमेशन कमी होते. त्याचसोबत आरोग्य उत्तम राहण्यास ही मदत होते.
भिजवलेले आक्रोड खाल्ल्याने झोप ही व्यवस्थितीत लागते. यामुळे वजन ही नियंत्रणात राहण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि बॅड कोलेस्ट्ऱॉल ही आक्रोडमुळे कमी होते. शरिरात उर्जा टिकून राहते. त्यामुळे तुम्ही दररोज 2-4 भिजवलेले आक्रोड खाऊ शकता.
हेही वाचा- Acidity कमी करण्यासाठी मुलेठी येईल कामी