Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल उचकी थांबत नाहीये? मग 'हे' नक्की करा

उचकी थांबत नाहीये? मग ‘हे’ नक्की करा

Related Story

- Advertisement -

उचकी आपल्याला कधीही आणि कुठेही लागू शकते. उचकी लागली आपण साहाजिकच अस्वस्थ होतो आणि लवकरात लवकर ती थांबवण्याच्या प्रयत्न सुरु करतो. सहसा उचकी लागल्यावर आपण पाणी पितो अथवा साखर खातो. मात्र अनेकदा हे करुनही बराचवेळ उचकी थांबायचं नाव घेत नाही. अशावेळी उचकी थांबवण्यासाठी आपण अन्य काही उपायही करु शकतो. चला, जाणून घेऊयात कोणते आहेत हे उपाय.

उचकी थांबवण्यासाठी काही सोपे उपाय –

1. उचकी थांबत नसल्यास जीभेखाली एक किंवा अर्धा चमचा मध ठेवावा. त्याचा त्वरित परिणाम तुम्हाला जाणवेल. तुम्ही कामाच्या ठिकाणी असताना किंवा बाहेर जाताना मधाची छोटी बाटली स्वत:सोबत सहज कॅरी करू शकता.

- Advertisement -

2. उचकी लागल्यावर कानाच्या खालचा भाग काहीवेळ दाबून धरल्यास उचकी थांबते, अशी जुनी समजूत आहे.

3. बर्फ किंवा तशाचप्रकारचे अन्य काही थंड पदार्थ घशावर ठेवल्यास उचकी थांबण्यास मदत होते.

- Advertisement -

4. मद्यपानानंतर उचकी लागल्यास लिंबाचा छोटा तुकडा जीभेखाली ठेवावा. यामुळे उचकी त्वरित थांबेल.

5. पेपर बॅग किंवा कापड यांच्या साहाय्याने देखील तुम्ही उचकी थांबवू शकता. उचकी लागल्यावर कापड किंवा कागदी पिशवी तोंडाजवळ घेऊन श्वास घ्या व सोडा. यामुळे रक्तातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते आणि उचकी थांबते.


नेमकी कशामुळे लागते उचकी?

कुणीतरी आपली आठवण काढत असेल तर आपल्याला उचकी लागते, असं आपला सर्वसाधारण समज असतो. परंतु उचकी लागण्यामागे काही कारण आहे. आपल्या श्‍वसनक्रियेमध्ये स्नायूंनी बनलेला हा एक मांसल पडदा महत्वाची भूमिका बजावत असतो. शास्त्रीय भाषेत त्याला श्वासपटल म्हणतात. काही अचानक कारणांमुळे या श्‍वासपटलाचे स्नायू आकुंचन पावतात. ही प्रक्रिया आपल्या मर्जीने नाही तर शरीरातील काही बदलांमुळे घडते. (उदाहरणार्थ- अति गरम किंवा थंड पदार्थ खाणे, खूप दम लागणे, मद्यपान वा धूम्रपान इत्यादी ) हे आकुंचन आपल्या मर्जीने घडत नाही. ती एक अनैच्छिक क्रिया असते.

का येतो आवाज?

हे स्नायू जेव्हा आकुंचन पावतात त्यावेळी काही क्षणासाठी घशातल्या स्वरयंत्राच्या ताराही एकमेकांच्या जवळ येतात. त्यातूनच ‘हिक्’ किंवा ‘हिचक’ असा आवाज येतो.

- Advertisement -