Sunday, March 16, 2025
Homeमानिनीपावसाळ्यात येणारा थकवा आणि आळस असा करा दूर

पावसाळ्यात येणारा थकवा आणि आळस असा करा दूर

Subscribe

पावसाळा सर्वाना थंडावा देतो पण त्यासोबतच येताना आळस आणि थकवाही घेऊन येतो. त्यामुळे या ऋतूत काहीस करावेसे वाटत नाही आणि सतत झोप येते. खरं तर, या दिवसात पावसातील बदलत्या वातावरणामुळे मेटॅबॉलिझम क्रिया मंदावलेली असते. त्यामुळे दिवसभर आळसपणा जाणवतो. जर तुमच्या बाबतीतही असं घडत असेल आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात येणाऱ्या थकवा आणि आळस दूर करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला येणारा आळस आणि थकवा चुटकीसरशी कमी होईल.

  • पावसाळ्यात दमट वातावरण असते. ज्यामुळे आपल्याला डिहायड्रेशन होते. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागते. परिणामी, तुम्हाला आळसपणा जाणवतो. अशावेळी तुम्ही पुरेसे पाणी प्यायला हवे. याव्यतिरिक्त तुम्ही नारळ पाणी, लिंबू पाणी सुद्धा पिऊ शकता. या उपायाने थकवा आणि झोप दूर होईल.
  • पावसाळ्यात चहा – कॉफी पिण्याऐवजी आरोग्यदायी काढे प्यावेत. खरं तर चहामुळे झोपेच्या चक्रावर परिणाम होतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी तुम्ही तुळशीचा काढा, आल्याचा चहा अशी पेये प्यायला हवीत.\

  • पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते. त्यामुळे या दिवसात पचण्यास जड जातील अशी पदार्थ खाऊ नयेत. खरं तर पावसाळ्यात वातावरण थंडगार असते, त्यामुळे तळलेले, चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा सर्वानाच होते. पण असे पदार्थ खाऊन सुस्ती जास्त प्रमाणात येते. त्यामुळे पावसाळ्यात जड पदार्थ खाऊ नयेत.
  • आळस आणि थकवा दूर करण्यासाठी व्यायाम करणे बंद करू नये. पावसामुळे जिमला जाणे शक्य नसेल तर घरीच शारीरिक हालचाली कराव्यात. यामुळे तुम्हाला उत्साही वाटण्यास मदत होते. खरं तर, जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि मेटॅबॉलिझम क्रिया व्यवस्थितरीत्या होते. परिणामी तुमचा आळस आणि थकवा दूर होते.

 

 

 

 

 


हेही पाहा :

Edited By _ Chaitali Shinde

Manini