घरात आलेल्या पालीमुळे प्रत्येकजण त्रस्त असतो. किचन असो किंवा बाथरुममध्ये आपल्याला पाल दिसूनच येते. उन्हाळ्यानंतर पावसाळ्यात पालींची अंडी फुटतात आणि तेव्हापासून पाली घरात अधिक प्रमाणात दिसू लागतात. अशातच लोक त्यांना घरातून पळवण्यासाठी विविध केमिकलचा वापर केला जातो. परंतु हे केमिकल घरातील मुलं आणि पाळीव प्राण्यांसाठी हानिकारक होऊ शकते. अशातच घरातून पालींना पळवून लावण्यासाठी पुढील काही ट्रिक्स वापरु शकता.
कांदा-लसूणचा वापर
जेव्हा आपण किचनमध्ये कांदा-लसूणचा वापर करतो तेव्हा त्याच्या साली फेकून देतो. मात्र तुम्हाला माहितेय का, कांदा-लसूणच्या सालींमुळे पाल पळून जाऊ शकते. यासाठी तुम्ही एक स्प्रे तयार करा आणि त्यासाठी तुम्ही लसूण, कांद्याची साल आणि मिर्ची एकत्रित करा. आता एका बाउलमध्ये तीन ग्लास पाणी टाकून 3-4 दिवसांपर्यंत ठेवा. त्यानंतर पाणी गाळून घेऊन त्याचा स्प्रे तयार करा. हा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी स्प्रे करु शकता जेथे पाल येते.
लिंबू, मिर्ची आणि विनेगरचा वापर
लिंबू, मिर्ची आणि विनेगरचा वापर करुन त्याचा एक स्प्रे तयार करुन पालीला पळवू शकता. यासाठी एका बाउलमध्ये 3-4 मोठा चमचा लाल तिखट मिर्ची टाका. त्यात दीड ग्लास पाणी मिक्स करा. आता पाण्यात अर्ध्यापेक्षा एक बाउलमध्ये लिंबूचा रस आणि चार मोठे चमचा विनेगर मिक्स करा. या सर्व गोष्टी मिक्स करा आणि गाळणीने गाळून घ्या. जेणेकरुन स्प्रे बॉटलमध्ये चिकटणार नाही. आता मिक्स केलेला स्प्रे त्या ठिकाणी लावा जेथे पाल येते. हा उपाय आठवड्यातून 3-4 वेळा केल्यास तर पाल घरातून दूर पळेल.
हेही वाचा- उंदरांना घरातून पळवण्यासाठी घरगुती उपाय